BSF Job: बारावी उत्तीर्णांना बीएसएफमध्ये नोकरीची संधी, १ लाखाहून अधिक मिळेल पगार

BSF Job: बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (Border Security Force, BSF) ज्युनिअर एक्स रे असिस्टंटसह अनेक पदांची भरती केली आहे. या भरतीद्वारे एक्स रे असिस्टंट, स्टाफ नर्स, कॉन्स्टेबल आणि इतरांची एकूण ६४ पदे भरली जाणार आहेत. या पदांवर भरतीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि भरती अधिसूचना वाचा.

वयोमर्यादा

सर्व पदांसाठी वयोमर्यादा स्वतंत्रपणे दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया भरती सूचना तपासा.

Talathi Bharati: राज्यातील चार हजार तलाठी भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट

अर्ज शुल्क

बीएसएफमध्ये या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

BSF Job: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पगार

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल ३,४,५,६ च्या आधारे २५ हजार रुपये ते १ लाख १२ हजार ४०० रुपये वेतन दिले जाणार आहे.

२२ फेब्रुवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IB Recruitment 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी
SPPU Job: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Source link

BSF JobBSF RecruitmentBSF salaryHSC passedIndia JobJob 2022job opportunityMaharashtra TimesRecruitment 2022बारावी उत्तीर्णांना नोकरीबीएसएफमध्ये नोकरी
Comments (0)
Add Comment