कोयता गँगचे ७ खतरनाक आरोपी येरवडा जेलमधून फरार; अशी शक्कल लढवली की अधिकारीही चक्रावले

पुणे : पुण्यातील येरवाड्याच्या बाल सुधारगृहातून मध्यरात्री कोयता टोळीतील ७ खतरनाक विधी संघर्ष बालक सुधरगृह तोडून पळाले गेले आहेत. सातही विधी संघर्षित बालक शहरात धुमाकूळ घालणाऱ्या, कोयता टोळीतील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील येरवडा इथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात हे सातही विधी संघर्ष बालकांना काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात ठेवण्यात आले होते.

काल मध्यरात्री ११ ते १२ च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून हे विधी संघर्षित बालक पळवून गेले आहेत. सुधारगृह तोडून खतरनाक विधी संघर्ष बालक पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता टोळीने मोठी दहशत माजवली आहे. पोलीस सातत्याने कोयता टोळीवर कारवाई करत असताना पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बाल सुधारक ग्रहांमध्ये सात विधी संघर्ष बालक पळून गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

खेळता-खेळता बांधकाम सुरू असलेल्या लिफ्टजवळ गेला अन्…, १० वर्षीय चिमुकल्याचा भयंकर शेवट
हे सातही विधी संघर्ष बालक कोयता टोळीचे सदस्य असल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शहरांमध्ये पुन्हा कोयता टोळीची दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती सुधार ग्रहाच्या प्रशासन करून देण्यात आलेली नसली तरी हे ७ जण रात्री पळून जाण्यात यशस्वी झाले. शिडी लावून बालगृहाच्या खिडकीमधून यांनी पलायन केलं. सातही आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केले असून बालसुधारगृहांमध्ये ठेवण्यात आले होते. यामुळे त्यांना पकडणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे.

भिंत कोसळली अन् सापडला मोठा खजिना; मजुर करोडपती झालाच होता, पण…

Source link

pune news today in marathipune yerwada jail crime newspune yerwada jail news todayyerwada jail puneपुणे न्यूज बातम्यापुणे येरवडा बातम्यापुणे हाई अलर्टयेरवडा जेल न्यूज़येरवडा जेल पुणे
Comments (0)
Add Comment