कशी आहे गौतम अदानींच्या ग्रहांची स्थिती? काय सांगते कुंडली? भविष्याबद्दलही जाणून घ्या

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांच्या जोरदार घसरणीमुळे जगातील पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल झाला असून, भारतीय अब्जाधीश गौतम अदानी चौथ्या स्थानावरून पायउतार झाले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात स्थित रिसर्च फर्म, हिंडेनबर्गचा अहवाल अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाला चांगलाच महागात पडत आहे. रिसर्च फर्मचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून, अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये खळबळ उडाली आहे. शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला. यापूर्वी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनर्स इंडेक्समध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर विराजमान गौतम अदानी आता सातव्या क्रमांकावर आले आहेत. अशा स्थितीत गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहाची आगामी काळात काय स्थिती असेल. आणि अदानी समूहाबाबत अचानक हा मोठा फसवणुकीचा बॉम्ब का फुटला आहे. ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांच्याकडून जाणून घेऊया, अदानीला आता हा मोठा धक्का का बसला आहे आणि पुढे काय होणार आहे.

वर्ष २०२३ मध्ये अनेक बड्या सावकारांची अवस्था बिघडेल आणि एक मोठा मुद्दा समोर येईल. वर्षाच्या सुरुवातीलाच अदानी समूहाचे प्रकरण समोर आले आहे आणि भविष्यात आणखी अनेक मोठी नावे समोर आली तर नवल वाटू नये. सध्या अदानीबद्दल बोलायचे तर, ज्योतिषशास्त्रीय मूल्यांकनावरून असे समजते की, गौतम अदानी यांची जन्मराशी कुंभ आहे, ज्यामध्ये शनीने नुकतेच १७ जानेवारी रोजी प्रवेश केला आहे आणि अशा स्थितीत हा साडेसातीचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हेच कारण आहे ज्यामुळे गौतम अदानी यांना अचानक या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

चौथ्या स्थानावरून यामुळे घसरले अदानी

२४ जून १९६२ ला सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी गुजरात येथील अहमदाबाद येथे गौतम अदानी यांचा जन्म लग्नराशी वृषभ मध्ये झाला आहे. त्यांची चंद्र राशी कुंभ आहे. यांच्या जन्म कुंडलीत भाग्यस्थानी विराजमान दशमेश कर्म तसेच नवमेश म्हणजेच भाग्येश शनी पराक्रमाच्या स्थानी कुंडलीतील तीसऱ्या स्थानी विराजमान शुक्रच्या केंद्रस्थानी दृष्टीक्षेपात राजयोग तयार करत आहे. सोबतच दशम भावात गुरू आणि चंद्राचा सुंदर गजकेसरी योग तयार होत आहे. अशा स्थितीत नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांच्या वेळी गौतम अदानी यांच्या कुंडलीत लग्नस्थानी विराजमान बुधची विंशोत्तरी दशा सुरू होती, त्यात त्यांनी स्टील, पॉवर, खाणी , रेल्वे , बंदर यासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू केला आणि खूप प्रगती केली. अडानीची नवांश आणि दशमांश कुंडलीत बुध दशम भावात राजयोग तयार करत आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनर्स इंडेक्सनुसार,वर्ष २०१४ मध्ये गौतम अदानी श्रीमंतात २.८० अरब डॉलर संपत्तीसोबत ६०९ व्या स्थानी होते. परंतू गेल्या ८ वर्षात संपत्तीतील वृद्धी पाहता टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर होते. पण शनीच्या शुभ योगात श्रीमंतीच्या शिखरावर चढले होते तशीच आता साडेसाती त्यांना त्रासदायक ठरत आहे.

गौतम अदानींचा त्रास आणखी वाढणार का? काय होईल पुढे?

शुक्रची महादशा गौतम अदानींच्या कुंडलीत डिसेंबर २०१४ पासून सुरू झाली ज्यात ते प्रगती करत गेले. परंतु, शुक्र लग्नासोबत त्यांच्या कुंडलीतील कलहाचे स्थान सहाव्या भावातील स्वामी असल्याने राहुसोबत युती असून, नैसर्गिक पापग्रह शनी आणि मंगळ ग्रहांचीही दृष्टी आहे. अशा स्थितीत अदानींची परिस्थिती वादग्रस्त ठरणार, हे त्यांच्या भाग्यात लिहिले आहे. यांच्या नवांश कुंडलीत शुक्रची युती मंगळ आणि राहू सोबत आहे याकारणामुळे पुढे जाऊन त्यांना आरोग्यासंबंधी अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते. जून २०२३ पर्यंत गौतम अदानी यांच्या कुंडलीत शुक्र-राहू-शनिची अशुभ दशा सुरू आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. जूननंतर शुक्र-राहू-बुध काही काळ अडचणी कमी करणारे ठरू शकतात, परंतु २०२४-२५ मध्ये खटले, आर्थिक अनियमिततेची चौकशी आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना ते सामोरे जाताना दिसतील. तसेच, पुढे जाऊन अब्जाधीशांच्या यादीतूनही ते खूप घसरू शकतात, असे ज्योतिषीय गणनेतून दिसून येत आहे.

टीप:

हे गौतम अदानी यांच्या कुंडलीवर आधारित ज्योतिषी विश्लेषण आहे. या प्रकरणात जे काही निष्पन्न होईल आणि भविष्यात जे काही होईल ते निर्मात्याच्या हातात आहे. आम्ही महाराष्ट्र टाइम्स या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. हे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण ज्योतिषाच्या गणना आणि मूल्यांकनावर आधारित आहे.

Source link

adani kundaliastrologyGautam Adani Kundaliअडाणीचे शेअरगौतम अडानी कुण्डलीशेअर मार्केटमध्ये मोठी घसरण
Comments (0)
Add Comment