वाचा: Airtel युजर्स फ्रीमध्ये घ्या लाईव्ह TV, मुव्हीज आणि शोजची मजा, पाहा प्लान्स
जिओचा २९६ रुपयांचा प्रीपेड प्लान:
जिओचा २९६ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लानमध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जातात. यामध्ये यूजर्सना २५ GB डेटा मिळतो. हा प्लान Jio 5G ऑफरसह येतो. म्हणजेच या प्लानमध्ये यूजर्स 5G चा आनंद घेऊ शकतात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.
वाचा: बेस्टच ! सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर ३० हजारांचा ऑफ, फोनमध्ये 108 MP कॅमेरासह भन्नाट फीचर्स
Airtel चा २९६ रुपयांचा प्लान:
एअरटेलच्या २९६ रुपयांच्या प्लानमध्ये 25GB बंडल डेटा मिळतो. याशिवाय, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. पण फायद्यांच्या बाबतीत, प्लॅनमध्ये पोलो 24X7 सर्कल फायदे, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक, मोफत हेलोट्यून्स आणि मोफत विंक म्युझिक सबस्क्रिप्शन आहे.
दोन्ही प्लान्स समान वैशिष्ट्यांसह येतात. म्हणजेच 25GB बंडल डेटा, 30 दिवसांची वैधता आणि अमर्यादित कॉलिंग. पण, फरक फक्त फायद्यांमध्ये आहे. जर तुम्ही Jio किंवा Airtel युजर असाल तर, तुमच्याकडे मासिक पॅकचा पर्याय असेल, जो तुम्ही तुमच्या इंटरनेट वापरानुसार वापरू शकता.
वाचा: ३६५ दिवसांपर्यंत वैधता, मोफत कॉल, एसएमएस ऑफर करणारे हे प्लान्स एकदा पाहाच