देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला; मंत्रिमंडळ बैठकीवर राज्यातील MPSC विद्यार्थ्यांचे लक्ष

पुणे :MPSC परीक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागून करावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात आज (ता. ३१ जानेवारी) ‘एमपीसी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थी आंदोलकांना भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्याशी आम्ही सहमत आहोत, असे सांगत या आंदोलनास आपला पाठिंबा दिला.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगण्यात आल्या. यावर बोलताना फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांच्या मागण्या या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोचवल्या जातील आणि नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, २०२५ पासून हा नवीन पॅटर्न लागू करण्यात आल्यावर पुन्हा २०२७ ची मागणी विद्यार्थ्यांनी करू नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी विराटची धार्मिक यात्रा; PM मोदींच्या गुरूंच्या आश्रमात ध्यान

यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, आपल्या मागण्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपल्यासमोरच फोनवर बोलणं झालं आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय होईल आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतील. फडणवीस यांनी कुठला विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला आणि तो मान्य होणार नाही असं कधी होत नाही, यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. जोपर्यंत आपल्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आपण इथून उठू नये मी देखील आपल्या आंदोलनात सहभागी असणार आहे, असेही पवार म्हणाले.

वाचा- आर्थिक पाहणी अहवाल २०२३: कधी, कुठे आणि कसा पाहा Live; येथून करा डाऊनलोड

पडळकर म्हणाले की, हे आंदोलन कुठल्याही पक्षाच नसून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच आमची भावना आहे. आम्ही एकदा कुठल्या आंदोलनात लक्ष घातलं की ते पूर्ण करतो असे सांगत पडळकर यांनी एसटी आंदोलनाची अप्रत्यक्षरीत्या आठवण करून दिली. तसेच फडणवीस विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. तसेच मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनात सहभागी असणार, असेही जाहीर केले.

वाचा- मंदीची चिंता गेली, नोकर कपातीचे टेन्शन गेलं; बजेटच्या आधी आली सर्वात मोठी गुड न्यूज

दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेली मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य होणार का? आणि एमपीएससी कडून या संदर्भातील नोटिफिकेशन काढण्यात येणार का? हे पाहणं मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

Source link

cabinet meetingdemand of mpsc studentsDevendra Fadnavisdevendra fadnavis on mpsc studentsmpscmpsc studentsMPSC परीक्षा नवीन पॅटर्नदेवेंद्र फडणवीस
Comments (0)
Add Comment