चंद्रावर उडी मारण्याचा विचार कराल तेव्हा.. आजच वापरायला लागा शाहरुखचा सक्सेस मंत्रा

मुंबई- शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमा रिलीज झाल्यापासून थिएटवर अधिराज्य गाजवत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला जमवून सिनेमाने इतिहास रचला. अशात सोमवारी ‘पठाण’ सिनेमाच्या टीमने पत्रकार परिषद घेत चाहत्यांचे आभार मानले. शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एकत्र येत सिनेमाबद्दल खूप साऱ्या गप्पा मारल्या. यावेळी शाहरुखने ‘झिरो’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास कसा डळमळीत झाला होता ते सांगितलं.

दीपिका रडली तर, शाहरुखने जॉनला केलं किस, वाचा प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्की काय काय झालं

शाहरुख खान बाथरूममध्ये रडला होता

गेल्या चार वर्षांच्या संदर्भात शाहरुखने सांगितलं की २०१८ मध्ये ‘झिरो’ फ्लॉप झाल्यानंतर लोकांनी त्याचं फिल्मी करिअर संपल्याचं सांगितलं होतं. त्याने सांगितलं की एक वेळ अशीदेखील होती जेव्हा त्याला स्वतःवर आत्मविश्वासच वाटत होता. यावेळी शाहरुखने आणखी एक खुलासा केला. त्याच्या घरी एक वेगळं बाथरूम आहे जिथे तो रडतो. तो म्हणाला की, ‘घरात सगळ्यांना माहीत आहे की मी जर त्या बाथरूममध्ये असेन तर ते बंद करून मी रडतच असणार.’


काय आहे शाहरुखच्या यशाचा मंत्र?

किंग खान म्हणतो की, तो एक गोष्ट शिकला ती म्हणजे, जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुम्ही नव्याने सुरुवात करायला हवी. तो म्हणाला की, ‘रविवारी तुम्हाला वाईट वाटत असेल, तर सोमवारी तुम्ही नवीन विचाराने जागे व्हा. जर तुम्हाला दररोज असं वाटत असेल की इतर लोक माझ्यापेक्षा चांगले आहेत, परंतु मी देखील सर्वोत्तम आहे तरच तुम्ही जिथे पोहोचू इच्छिता तिथे पोहोचू शकाल.’ शाहरुख खान म्हणाला की, ‘लोकांना वाटेल की तो अहंकारी आहे पण असे नाही, आपण स्वत: ला सर्वोत्तम मानले पाहिजे. आपण सर्वोत्कृष्ट आहोत हा विचार करून जगलं पाहिजे. जर तुम्ही चंद्रावर उडी मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही १० व्या किंवा २० व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार.’

बॉलिवूडमध्ये एक तर सेक्स चालतं किंवा शाहरुख खान, अभिनेत्रीचं २० वर्षांपूर्वीचं बोलणं झालं खरं


शाहरुखने दिला बंधुभावाचा संदेश

अखेर शाहरुख खानने चाहत्यांना प्रेमाने राहण्याचा संदेश दिला. तो म्हणाला की, ‘जगभरात जे लोक सिनेमा बनवतात, मग ते उत्तर, दक्षिण किंवा कुठेही असोत, प्रत्येकाचा उद्देश लोकांना आनंद देणं आणि प्रेम पसरवणं हाच असतो. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. फक्त लोकांना आनंदी ठेवायचे आहे. मनोरंजनसृष्टीला फारसं गांभीर्याने घेतलं जाऊ नये. आपण सारेच प्रेमाचे भुकेले आहोत, कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. ही दीपिका पादुकोण आहे, ती अमर आहे. मी शाहरुख, मी अकबर, तो जॉन आहे, तो अँथनी आहे. अमर, अकबर अँथनी आम्ही एकत्र आहोत.’



Source link

Deepika PadukoneJohn Abrahampathaan collectionpathaan press conferencepathaan shah rukh khanshah rukh khanshah rukh khan latest newsshah rukh khan pathaanshah rukh khan photosshah rukh khan videos
Comments (0)
Add Comment