कोयत्याचं लोण शाळांपर्यंत, मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून १७ वर्षीय मुलावर पुण्यात हल्ला

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होत नाहीये. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याने ही खरी चिंतेची बाब आहे. या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज शहरात अशाच एका धक्कादायक घटनेने खळबळ माजली आहे. प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाले असून त्यात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील नुतन मराठी विद्यालय (नुमवी) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला आहे. अल्पवयीन तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आर्थिक पाहणी अहवाल सादर; GDP ६ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज, कर्ज घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी

ज्याच्यावर हल्ला झाला आहे, तो पद्मवती या भागात राहायला असून तो १२वीमध्ये शिक्षण घेत आहे. ज्याने हल्ला केला तो तुळशीबागेत काम करतो. हल्ला झालेला मुलगा आरोपी मुलाच्या मैत्रिणीशी बोलत बस स्टॉपला बसला होता. याचा राग त्याला आणि त्याने संबंधित विद्यार्थ्यावर कोयता उगारला आणि या हल्ल्यात त्याच्या शेजारी असलेल्या विद्यार्थ्याला देखील हा कोयता लागला. या हल्ल्यात तो देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, पुण्यातील येरवड्याच्या बाल सुधारगृहातून मध्यरात्री कोयता टोळीतील ७ खतरनाक विधी संघर्ष बालक सुधारगृह तोडून पळाले आहेत. सातही विधी संघर्षित बालक शहरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता टोळीतील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील येरवडा इथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात हे सातही विधी संघर्ष बालकांना काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात ठेवण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला; मंत्रिमंडळ बैठकीवर राज्यातील MPSC विद्यार्थ्यांचे लक्ष

Source link

attack on pune koyta studentPune crime newspune koyta gangPune Nutan Marathi Vidyalaya Attack on Studentpune nutan marathi vidyalaya koyta newsपुणे कोयता गँगपुणे कोयता विद्यार्थ्यावर हल्लापुणे क्राईम बातम्यापुणे नुतन मराठी विद्यालय कोयता बातम्या
Comments (0)
Add Comment