राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! MPSCचे नवीन नियम २०२५ पासून लागू होणार

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. एमपीएससीचे परीक्षांसंदर्भातील नवे नियम २०२५ पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

UPSC प्रमाणे आता MPSC ला देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. मात्र, हा पॅटर्न २०२३ नव्हे तर २०२५ पासून लागू करावा यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान यावर सरकारतर्फे सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Source link

mpscMPSC New RulesMPSC rulesएमपीएससीएमपीएससीचे नवीन नियम
Comments (0)
Add Comment