हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरेंच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ, पक्षात प्रवेश करताच अजित दादांकडून मोठी जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लोकप्रिय अभिनेते प्रभाकर मोरे यांची आता राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांनी नुकतंच राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मोरे यांचा पक्षात प्रवेश झाला.पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या मुंबईत इथल्या मुख्य कार्यालयात प्रभाकर मोरे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. अजित पवारयांच्या उपस्थितीत मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
अय्यो! ज्याच्यासोबत अफेअरच्या चर्चा त्याचाही आजच वाढदिवस; सायलीचे फोटो व्हायरल
पक्षाकडून मोठी जबाबदारी
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाकर मोरे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांना सांस्कृतिक कोकण विभागाच्या अध्यक्ष पादाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्ष प्रवेशानंतर प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीतच का प्रवेश केला याचं कारणंही सांगितलं.
एक आदर्श असाही! ‘तू चाल पुढं’मधील अश्विनीकडून प्रेरणा घेत तिने उघडलं स्वतःचं पार्लर; म्हणते-
काय म्हणाले प्रभाकर मोरे?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , सुप्रिया सुळे हे नेहमीच कलाकारांच्या मदतीसाठी पुढं आले आहेत. कोकणातल्या कलाकारांच्याही काही अडचणी, व्यथा आहेत. त्या मांडण्यासाठी, सोडवण्यासाठी , त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी पक्षात प्रवेश केलाय, असं मोरे यांनी सांगितलं. तसंच अजित दादांचा स्वभाव हे देखील एक पक्ष प्रवेशाचं कारण असल्याचं मोरे म्हणाले.

‘रमी’ची जाहिरात करणार नाही
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गेम ‘रमी’वर बंदी घालण्याची मागणी होत आहे. ऑनलाईन रमीच्या माध्यमातून अधिकृपणे जुगार खेळला जात आहे, असं राष्ट्रवादीनं म्हटलं होतं. यावर बोलताना मोरे म्हणाले की, मी रमीची जाहिरात करणार नाह, तसंच इतर कलाकारांनीही अशा जाहिराती करू नये , असं प्रभाकर मोरे या कार्यक्रमात म्हणाले.

Source link

prabhakar more in NCPprabhakar more in rashtrawadi congress partyrashtrawadi congress partyअजित पवारप्रभाकर मोरेराष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment