पाणीपुरी खाल्ली, पैसे मागितले तर डोक्यात तिडीक गेली; पुण्यात विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

पुणे : पुणे शहराची शांत शहर अशी ओळख फक्त आता पुस्तकात वाचण्याइतकीच उरली आहे की काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण दहशत माजवण्याचा हेतूने पुण्याच्या गल्लीबोळात भाई तयार होत आहेत. याचा मनस्ताप पुणेकरांना होत आहे. अशीच आपली भाईगिरी दाखवण्यासाठी दोन गुंडांनी वर्दळीचे ठिकाण असलेल्या शनिवारवाड्यासमोरच पाणीपुरी चालकावर चाकूने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले.

पाणीपुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने या दोघांनी पाणीपुरी चालकावर चाकूने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केलं. हा प्रकार शनिवारवाड्यासमोरील पाणीपुरी स्टॉलवर शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. या प्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मंदीची चिंता गेली, नोकर कपातीचे टेन्शन गेलं; बजेटच्या आधी आली सर्वात मोठी गुड न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाठम यांचा शिवाजी रोडवर शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास रिक्षातून दोघे जण अचानक आले. त्यांनी जाठम यांना “पाणी पुरी खिला, तू अपने भाई को बुला” असे म्हणाले. फिर्यादी यांनी त्यांना पाणीपुरी खाण्यास दिली.

पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर राजेंद्रसिंग यांनी त्या दोघांकडे पाणीपुरीचे पैसे मागितले असता त्यांना त्याचा राग आला. त्यानंतर त्यातील एकाने खिशातून चाकू काढला आणि राजेंद्रसिंग यांच्या हाताच्या कोपर्‍यावर व दंडावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केलं. तर दुसर्‍याने त्यांना हाताने मारहाण केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.

वाढदिवस ऋतुराजचा पण चर्चा सायलीने केलेल्या सेलिब्रेशनची, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Source link

pune breaking newsPune crime newspune local crime newspune shaniwarwada panipuri crimeपुणे क्राईम बातम्यापुणे ब्रेकिंग बातम्यापुणे लोकल क्राईम बातम्यापुणे शनिवारवाडा पाणीपुरी क्राईम
Comments (0)
Add Comment