महेश मांजरेकरांचं घातलं प्रतीकात्मक श्राद्ध; ‘त्या’ वक्तव्यामुळे जोरदार घोषणाबाजी अन् धरणे आंदोलन

बुलढाणा: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर लहुजी शक्ती सेनेकडून गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांनी ‘काळे धंदे’ या वेब सीरीज मध्ये बँड कलाकारांबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप दिग्दर्शकावर ठेवण्यात आला. या वक्तव्याच्या निषेधार्थ ३१ जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेकडून धरणे आंदोलन करण्यात आले.

या प्रकरणी महेश मांजरेकरांविरोधात तक्रार दाखल झाली असून त्यानुसार कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे. मांजरेकरांनी माफी मागावी अशी लहुजी शक्ती सेनेची मागणी असून यासाठी त्यांनी धरणे आंदोलन केले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी मांजरेकराचा निषेध म्हणून प्रतीकात्मक स्वरुपात त्यांचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी या लहुजी शक्ती सेनेतील काही आंदोलकांनी मुंडनही केले. मुंडन आंगोलन करत महेश मांजरेकरांचा निषेध करण्यात आला. दरम्यान या आंदोलनात शासन दरबारी इतर प्रलंबित मागण्याही लवकरात लवकर पूर्ण केल्या जाव्यात अशीही मागणी केली गेली.

हे वाचा-त्याने माझा हात हातात घेतला अन्… शाहरुखची भेट सायली संजीवसाठी ठरलेली खास

मांजरेकरांची ‘काळे धंदे’ ही वेब सीरिज विशेष गाजली होती. या सीरिजमध्ये एका लग्न समारंभावेळी बँड पथकाला खालच्या दराची वागणूक दिल्याचं दाखवण्यात आलं. मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या या सीनमुळे राज्यातील डीजे आणि बँड पथकवाल्यांची मनं दुखावली गेल्याचं सांगण्यात आलं. मांजरेकरांविरोधात अशी तक्रार करण्यात आली आहे की, या सीरिजमध्ये बँड चालकांना शिवीगाळ केल्याचा सीन दाखवण्यात आला. बँड पथक व्यावसायिक हे अनेकांच्या शुभ कार्यात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्वीगुणीत करतात, असं असताना त्यांचा अपमान करणारा सीन दाखवल्याने हा विरोध पाहायला मिळाला.

हे वाचा-शिव ठाकरे जिंकणार का बिग बॉसची ट्रॉफी? ‘विजयी भवं शिव’ होतंय तुफान ट्रेंड

बुलढाण्यापूर्वी बीडमध्ये काही दिवसांपूर्वी मांजरेकरांविरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली. याठिकाणी बँड पथकाच्या माध्यमातून मांजरेकरांविरोधात आगळ्यावेगळ्या पद्धतीने संगीताच्या तालावर घोषणाबाजी करण्यात आलेली.

Source link

Mahesh manjrekar Kale dhande Web Seriesmahesh manjrekar newsProtest Against Mahesh ManjrekarProtest Against Mahesh Manjrekar in Buldanaमहेश मांजरेकरमहेश मांजरेकरांविरोधात आंदोलन
Comments (0)
Add Comment