महिलांचे गळयातील मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपी अटक सिहंगड रोड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी….

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

दि. ३१/०१/२०२३

महिलांचे गळयातील मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या सिहंगड रोड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी….एकुण १० गुन्हे उघड

सिंहगड रोड पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये व पुणे शहर परिसरात दाखल असणा-या चैन स्नेचिंग च्या गुन्हयाचा तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम व त्यांची टिम यांनी दाखल गुन्हयांचे अनुषंगाने सी.सी.टि.व्ही. कॅमेराचे आधारे व गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढण्याचे काम सुरू असतांना सिहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ०८/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ मधील महिला फिर्यादी यांचे गळ्यातील मंगळसुत्र हिसकावुन तोडुन नेणारे आरोपी हे सनसिटी रोड भागात येणार असल्याबाबत गुप्त माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अमोल पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता सदर बातमी त्यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि सचिन निकम यांना सांगितली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा गुफजल आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून आडबाजूस थांबुन बातमीप्रमाणे खात्री केली असता खाडे वॉशिंग सेंटरच्या समोरिल बाजुस संशयितरित्या दोन इसम उमे असल्याचे दिसले असता त्यांना सापळा रचुन आहे त्या परिस्थीतीत पकडून त्यांचेकडे सदर ठिकाणी येण्याचे कारण व त्यांचा नाव पत्ता विचारता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असता त्यांना सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे आणुन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नावे १) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली निकाजी चव्हाण, वय २० वर्षे रा, धनगर वस्ती, देवाची ऊरळी मंतरवाडी पुणे २) राजु महादेव डेंगळे वय १९ वर्षे, रा. प्रतिकनगर लेन नं १, कात्रज कोंढवा रोड, पुणे असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दिनांक ०३/०१/२०२३ रोजी सायंकाळी १९/५० वा. चे. सुमा गिरीजा हॉटेल शेजारील बसस्टॉप जवळ धायरी पुणे येथे एका महिल्याचे गळयातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावुन ओढुन तोडुन नेल्याबाबत सांगितले असुन त्यांचा आणखीन एक साथीदार नामे गजानन दत्तात्रय बो-हाडे, वय ३० वर्षे, रा. हिवरकर मळा, सासवड पुणे यांचसोबत पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी चैन स्नेचिंग गुन्हे केल्याचे कबुली दिली असता आरोपींना सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकमः यांनी सदर गुन्हयांत दिनांक २३/०१/२०२३ रोजी अटक करुन पोलीस कस्टडीमध्ये त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी पुणे शहरामध्ये खालील गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन झाले आहे.

१) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ०८/२०२३, भा.द.वि. कलम ३९२, ३४ २) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ३३० / २०२२. भा.द.वि. कलम ३९२, ३४

३) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ३८/२०२३. भा.द.वि. कलम ३९२. ३४ ४) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ५६/२०२३. भा.द.वि. कलम ३९२, ३४

(५) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ४४५/२०२२, भा.द.वि. कलम ३९२, ३४

६) भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ८१२/२०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४

७) भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ८८० / २०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४ ८) समर्थ पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४

९) हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १६७८/२०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४ (१०) कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १२२५/२०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४

वरिल प्रमाणे एकुण १० गुन्हे उघड झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, मा. संदिप कर्णिक पोलीस सह आयुक्त सो, मा. श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे. मा. श्री सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त सो, परि ३. पुणे. मा. श्री. राजेंद्र गलांडे, सहा. पोलीस आयुक्त सो, सिंहगड रोड विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, श्री. सचिन निकम, सहा. पोलीस निरीक्षक, गणेश मोकाशी, पोलीस उप निरीक्षक, श्री आबा उत्तेकर, सहा. पोलीस फौजदार, पो. हवा. संजय शिंदे, पो. हवा. धनंजय शेटे. पो. हवा. सुनिल साळुंखे, पोलीस अंमलदार राजु वेगरे, अमित बोहरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोडे, अमोल पाटील, स्वप्नील मगर, विकास पांडुळे, विकास बांदल, सागर शेडगे यांनी केली आहे.

(जय राजुरकर)

पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर

Comments (0)
Add Comment