VIDEO: चौथीत असताना नागराज मंजुळेंना होतं दारुचं व्यसन? म्हणाले दारु वाईट नाही हो…

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे गेल्या काही दिवसांपासून मुलाखतीमुळं चर्चेत आले आहे. या मुलाखतीत त्यांनी सगळ्याच प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी नागराज यांची घेतलेली मुलाखत चांगलीच रंगली. या मुलाखतीतून मंजुळे यांनी स्वत: जगलेले अनुभव सांगितले.

एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन तसेच रूपेरी पडद्यावर लक्षवेधी अभिनय करून अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. इतकेच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपली छाप पाडली आहे. नागराज यांचे ‘फँड्री’, ‘नाळ’, ‘सैराट’ यांसारखे चित्रपट गाजले आहेत. ‘सैराट’च्या अमाप लोकप्रियतेनंतर नागराज यांनी ‘झुंड’मधून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आणि तिथंही आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांचा मनोरंजनसृष्टीतील आजवरचा प्रवास, बदलता मराठी चित्रपट, तरुण प्रेक्षकांविषयीची त्यांची मते, या मुलाखतीत ऐकायला मिळाली.

नवी मुंबईतील एका कॉलेजमध्ये हा मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी विद्यार्थ्यांनीही अनेक प्रश्न नागराज यांना विचारले. एका प्रश्नानं तर सगळ्यांचं लक्ष वेधलं. नागराज मंजुळेंना शाळेत असतानाच दारुचं व्यसन लागलं होतं. यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता.

नागराज चौथीत असताना दारु प्यायचे, त्यांच्या वडिलांना दारुचं व्यसन होतं. घरात असेलल्या दारुच्या बाटल्यांमधली दारु नागराज प्यायचे, आणि नंतर त्यात हापस्याचे पाणी त्यात भरून ठेवायचे, असा किस्सा उपस्थित एका व्यक्तीनंच सांगितला. तसंच नागराज मंजुळे यांना चौथीत लागलेलं हे दारुचं व्यसन सातवीत सुटलं, याचा खुलासाही त्या व्यक्तीनं केला. हे व्यसन नेमकं कसं सुटलं असा प्रश्न नागराज यांना विचारण्यात आला होता. यावर नागराज मंजुळेही हसले आणि माझ्याबद्दल बराच रिसर्च करून आलाय, असं म्हणाले.

पाहा व्हिडिओ:

दारुचं व्यसन कसं सुटलं हे सांगताना नागराज म्हणाले की,…
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की, ती वाईट आहे, व्यसन आहे. व्यसन म्हटलं की फक्त दारूच आठवते. व्यसन घातक आहे दारू डेंजर आहे, असं मला म्हणायचं नाही. पण त्याचा अतिरेक केला तर घातक आहे. सिगारेटला ग्लॅमर आहे. त्यात फार नसंतय. सिगारेट ओढतानाची स्टाइल भारी वाटते. म्हणून लयजण सिगारेट पितात, तंबाखू खाणंही व्यसनच आहे, पण दिसायला चांगली नाही, म्हणून लपून खातात काहीजणं.

एखादा माणूस दारु पिऊन मरतोय, असं म्हणतात. पण ते तसं नसतं. तो दारु, त्याचं दु:ख , दैन्य समस्या पिऊन मरतंय. आपण दारू सोडा म्हणून सांगतो. त्याच्या समस्येला हात घालत नाही. हे खूपच गुंतागुंतीचं आहे. याचं काळं पांढरं मला करू वाटत नाही, असं नागराज यावेळी म्हणाले.

Source link

nagraj manjuleNagraj Manjule Interviewnagraj manjule interview in marathiNagraj Manjule Interview in vashi collegeNagraj Manjule on addictionNagraj Manjule on alcohol addictionनागराज मंजुळे
Comments (0)
Add Comment