बादशाहच करू शकतो! कट्टरतावाद्यांना शाहरुखचा सल्ला, ‘पठाण’चं अमर अकबर अँथनी कनेक्शन

मुंबई : पठाण सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवत आहे. त्यानिमित्तानं सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित सिनेमाच्या टीमने पहिल्यांदा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात सर्वच कलाकारांनी धर्माच्या नावाखाली तणाव निर्माण करणाऱ्यांवर त्यांची मतं व्यक्त केली. शाहरुख यावेळी म्हणाला की, सिनेसृष्टीत जातीपातीवरून काही गोष्टी केल्या जात आहेत. या गोष्टीकडे लक्ष वेधत तणाव निर्माण करणाऱ्यांना त्यानं काही गोष्टी सुनावल्या.

सोमवारीही चालली पठाणची जादू, सिनेमाने पार केले ६०० कोटी

पठाण सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचत दणदणीत कमाई केली. पठाण सिनेमाला मिळालेलं यश साजरं करण्यासाठी सिनेमाच्या संपूर्ण टीमने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वच कलाकारांनी सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत काही मजामस्तीही केली. त्याचवेळी शाहरुखने अत्यंत हृद्य आणि विचार करायला लावणारं मनोगत व्यक्त केलं.


काय म्हणाला शाहरुख

कार्यक्रमात शाहरुख म्हणाला की, ‘ही दीपिका पादुकोण आहे ती अमर आहे. मी शाहरुख खान अकबर आहे आणि हा जॉन अँथनी आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून सिनेमा केला आहे. आम्ही या सिनेमाचे अमर अकबर अँथनी आहोत. आमच्यात काहीही फरक नाही, आमची संस्कृती वेगळी नाही. आम्ही तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि त्यामुळेच आम्ही सिनेमे बनवतो. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो तसंच तुम्हीदेखील आमच्यावर प्रेम करावं असं वाटतं.’


शाहरुख म्हणतो आम्हालाही तुमच्या प्रेमाची गरज…

शाहरुख खानचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला. या व्हिडिओमध्ये शाहरुख पुढे म्हणतो की, ‘आम्हालादेखील तुमच्या प्रेमाची गरज आहे. जेव्हा तुमच्याकडून आम्हाला प्रेम मिळतं तेव्हा आम्ही आनंदित असतो. बॉक्स ऑफिसवर सिनेमानं कितीही पैसे कमवू दे त्यापेक्षा सिनेमा पाहिल्याानंतर प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम, त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्हाला अत्यानंद होत असतो. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारं प्रेम हेच आमच्यासाठी मोठं बक्षीस असतं. या सिनेमातून आम्हाला भरभरून मिळालं आहे. त्यासाठी खूप खूप आभार.’


शाहरुखनं यावेळी देशाची संस्कृती ही सिनेमांच्या माध्यमातून सांभाळली जात असल्याचं म्हटलं. तो म्हणाला की, ‘आपल्या देशाला समृद्ध आणि सुंदर संस्कृती आहे. ही पुरातन संस्कृती जिवंत राखणं गरजेचं आहे. आपल्या तरुण पिढीला संस्कृती थोडी आधुनिक स्वरुपात विविध गोष्टींच्या माध्यमातून सांगण्याची गरज आहे. जेव्हा आपण वेगळ्या पद्धतीनं गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या संस्कृतीची आम्ही मस्करी करतो, टिंगल करतो असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही त्या गोष्टी तरुण पिढीला भावतील अशा पद्धतींनं दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करत असतो.’

आजपासूनच वापरा शाहरुखचा सक्सेस मंत्रा, खमखास मिळेल यश

दरम्यान, पठाण सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील त्याची जादू सहाव्या दिवशीही कायम आहे. शाहरुखच्या पठाण सिनेमानं सहा दिवसांत हिंदीमध्ये ३०० कोटी रुपये कमावेल आहेत. तर सहा दिवसांत जगभरात सुमारे ६०० कोटी रुपये कमावले आहेत. सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमानं बॉलिवडूमधील सिनेमांचे अनेक विक्रम तोडले आहेत.



Source link

pathaan moive controversypathaan moviepathaan movie box office collectionshah rukh khanपठाण शाहरुख खानपठाण सिनेमाशाहरुख खान
Comments (0)
Add Comment