हे वाचा-‘तुझं वय सांगून गोची करणार नाही…’, केदार शिंदे यांनी केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
तर टास्क असा होता की नॉमिनेशनपासून वाचण्यासाठी सर्व स्पर्धकांना ९ मिनिटांचा हिशोब ठेवायचा होता. बिग बॉसने सुरू दिलेली वेळ सुरू झाल्यानंतर ९ मिनिटं कधी झाली हे कोणत्याही घड्याळाशिवाय सांगायचे असा टास्क होता. त्यानंतर स्पर्धकांनी मनातल्या मनात सेकंद मोजायला सुरुवात केली, पण यामध्ये एक ट्विस्ट होता. स्पर्धकांना त्यांच्याविषयी सोशल मीडियावर काय बोललं जातंय याचे स्क्रिनशॉट दाखवण्यात आले, तर त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे हेही दाखवण्यात आलं.
हे वाचा-प्रवीण तरडेंचा आणखी एक ‘खतरनाक’ लूक! मराठ्यांची शौर्यगाथा मांडणार नवा सिनेमा
यावेळी स्पर्धकांना मिळणाऱ्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया दाखवण्यासाठी लोकप्रिय फॅशन डिझायनर केन फर्न बिग बॉसच्या घरात पोहोचला होता. फिनालेसाठी हे स्पर्धक काय आउटफिट परिधान करतील हे हाच डिझायनर ठरवणार आहे. बिग बॉसने शिव ठाकरेलाही त्याच्यासाठी लोक काय प्रतिक्रिया देत आहेत, हे दाखवले. यामध्ये ‘विजयी भव शिव’ असे ट्रेंड होत असल्याचे शिवला सांगण्यात आले. यावर शिवची रिॲक्शन लक्ष वेधून घेणारी होती. ‘टिकिट टू फिनाले’ टास्कमध्ये प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या अशा प्रतिक्रिया पाहून शिव फारच उत्सुक दिसून आला. आता शिव ही ट्रॉफी जिंकेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
दरम्यान शिवव्यतिरिक्त अर्चना गौतम, सुंबुल तौकीर खान, शालिन भानोत आणि MC स्टॅन यांनीही हा टास्क खेळला. या स्पर्धकांना त्यांच्याबाबत सोशल मीडिया ट्रेंडवर काय बोललं जातंय हे सांगण्यात आलं. बिग बॉस १६ चा फिनाले १२ फेब्रुवारी रोजी होणार असून आगामी काही भागामध्ये आणखी काही एलिमिनेशन्स होताना दिसतील. निम्रितने आधीच अंतिम फेरीत स्थान मिळवल्याने ती बाहेर जाण्यापासून सुरक्षित असेल.