पुण्यामधील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मनसे निवडणूक लढण्यासाठी तयार असून कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. पुणे शहर मनसेच्या वतीने कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा राज ठाकरे यांना कळविण्याची निर्णय झाला आहे. आता पुढील आदेश आल्यानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवायची की नाही? ते ठरवण्यात येईल, असं मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितलं. शहरातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि शहर मनसेचीही निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याची माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे.
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकाऱ्यांची कसबा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा असताना दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणुकीत राज ठाकरे यांनी पत्र लिहून ती निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. आता मात्र मनसेने कसब्यात पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात यापूर्वी मनसेची कधीच एवढी मोठी ताकद नव्हती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून लढलेले रवींद्र धंगेकर यांनी मोठे मताधिक्य मिळवले होते. यामुळे आता कार्यकर्त्यांनीही पूर्ण तयारी केली आहे. इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे राज साहेबांना झालेल्या निर्णयाची माहिती देऊन राज साहेब पुढील आदेश देतील त्यानुसार मनसे निर्णय घेईल, असं साईनाथ बाबर म्हणाले.
मनसेच्या शहर कार्यालयामध्ये मनसेच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, किशोर शिंदे, योगेश खैरे, अनिल शिदोरे हे उपस्थित होते. तर अजय शिंदे आणि गणेश भोकरे हे इच्छुक उमेदवारही या बैठकीला उपस्थित होते.
अजित पवारांचा कट्टर समर्थक एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला? अण्णा बनसोडेंचा मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून प्रवास
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्याने वाड्याचा प्रश्न आहे. तिथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. तिथले मूलभूत प्रश्न आहेत. विशेष म्हणजे कसब्यातील नागरिक भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला कंटाळलेले आहेत. त्यामुळे ते मनसेला मतदान करतील. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका मनसेला फायद्याची ठरेल. त्यामुळे कसबा विधानसभा पोनिवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितलं.
Pune Kasba Bypoll: गिरीश बापटांचा अलिप्तपणा, उमेदवार ठरवण्यासाठी भाजपवर सर्व्हे