शब्द मागे घेत काय बोलला बागेश्वर बाबा?
‘संत तुकाराम हे एक महान संत आहेत. ते माझे आदर्श आहेत. मी तुकारामांबद्दल एका पुस्तकात त्यांच्यासंबंधी एक गोष्ट वाचली होती. त्यांची पत्नी विचित्र स्वभावाची होती. तसंच ऊसाच्या टिपऱ्याचीही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती. तुकारामांना त्यांची पत्नी ऊस आणायला पाठवते. पण ऊस आणल्यानंतर त्याच ऊसाने तुकारामांना त्यांची पत्नी मारते. त्यात उसाचे दोन तुकडे होतात. ही कहाणी मी आपल्या परिने भाविकांना सांगितली. पण आपल्या कहाणीमुळे वारकारी संप्रदायाच्या अनुयायींच्या भावना दुखावल्या. यामुळे मी माझे शब्द मागे घेतो’, असं बागेश्वर बाबा म्हणाला.
आधी काय म्हणाला होता बागेश्वर बाबा?
‘संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक महात्मा. त्यांची पत्नी रोज त्यांना मारायची. रोज काठीने मारत होती. तुम्ही बायकोचा रोज मार खाता, लाज वाटत नाही? असा प्रश्न कुणीतरी तुकारामांना एकदा विचारला होता. ही तर परमेश्वराची कृपा आहे, मला मारणारी बायको मिळाली, असं उत्तर तुकारामांनी दिलं होतं. यात कृपा कुठली? असं तुकोबांना पुन्हा विचारण्यात आलं. प्रेम करणारी बायको मिळाली असती तर देवाच्या प्रेमात पडलो नसतो, बायकोच्या मागे फिरत राहिलो असतो’, असं तुकारामांनी सांगितल्याचं बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र शास्त्री महाराजाने आपल्या प्रवचनात म्हटलं होतं. यामुळे हा बाबा वादात आला होता. या वक्तव्यावरून त्याच्यावर महाराष्ट्रातून जोरदार टीका करण्यात आली. तसंच त्याने माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.
आसाराम बापूचं उर्वरित आयुष्य जेलमध्येच जाणार, अत्याचार प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
यापूर्वी काय काय केली आहेत वादग्रस्त वक्तव्यं?
बागेश्वर धामचा धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज हा आपल्या वक्तव्याने कायम वादात असतो. काही दिवसांपूर्वी त्याने शिर्डी साई बाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सनातन धर्मियांकडे पूजा करण्यासाठी ३३ कोटी देत आहेत, तर मग चाँद मियाची पूजा करण्याची काय गरज आहे? असं तो म्हणाला होता. यामुळे धीरेंद्र शास्त्री महाराजावर धार्मिक आणि जातीवाद पसरवण्याचाही आरोप करण्यात आला. तसंच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एका व्यक्तीला अस्पृश्य म्हणत त्याने आपले पाय पडण्यास नकार दिला होता. भगवान कृष्ण यादव होते. भगवान राम क्षत्रिय होते. पुराणकाळातही जाती व्यवस्था होती. पण जातीवाद नव्हता. राजकारण्यांनी जातीवाद पसरवला, असा आरोप धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबाने केला होता.
बाळा दरवाजा उघड! खोली बाहेर आई, बाबा ओरडत होते; बंद दाराआड मुलासोबत घडलं भयंकर