‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या रक्कमेत वाढ; पुरस्कारासाठी एकूण २७ नावांचा प्रस्ताव

मुंबई : राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या नव्या निर्णयानुसार या पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याशिवाय हा पुरस्कार नव्या स्वरूपात आणि आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, या पुरस्कारासाठी २७ नावांचे प्रस्ताव आले असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी उपस्थित होते. या बैठकीत पुरस्काराच्या स्वरूपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. सुमारे २७ नावांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे आले होते, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याचे ठरले.

Source link

27 names proposed for Maharashtra Bhushan Awardaward priceEknath Shindeincrease amount of Maharashtra Bhushan Awardmaharashtra bhushan awardMeeting regarding Maharashtra Bhushan Award
Comments (0)
Add Comment