Child Pornography
Child Pornography संबंधी एक कायदा आहे. जर तुमच्याकडे असा कोणताही व्हिडिओ येत असेल तर त्याला तुम्ही चुकूनही पाहू नका. कारण, असे केल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होवू शकतो. तसेच यासंबंधी चुकूनही काधीही फेसबुकवर सर्च करू नका. यासंबंधी अलर्ट राहणे खूप गरजेचे आहे. हे सर्व कायद्याने बेकायदेशीर आहे.
वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा
Fake News
Fake News ला रोखण्यासाठी सरकार लागोपाठ पावलं उचलत आहेत. याच कारणामुळे तुम्हाला फेक न्यूज संबंधी खूप अलर्ट राहणे गरजेचे आहे. कोणतीही बातमी शेअर करण्याआधी व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. IT Act अंतर्गत जर कोणी फेक न्यूज शेअर करीत असेल तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जावू शकतो. त्यामुळे कोणतीही बातमी शेअर करण्याआधी ती एकदा तपासून पाहा किंवा शेअर करणे टाळा.
वाचा: Airtel युजर्स फ्रीमध्ये घ्या लाईव्ह TV, मुव्हीज आणि शोजची मजा, पाहा प्लान्स
Illegal Video
कोणताही व्हिडिओ शेअर करणे किंवा पाहणे कायद्याने गुन्हा आहे. जो बेकायदेशीर गटात येत असेल. यात अनेक प्रकारच्या व्हिडिओचा समावेश आहे. यात समाजाला नुकसान पोहोचवणाऱ्या व्हिडिओचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी नॉर्थ वेस्ट दिल्लीत झालेल्या दंगलीनंतर काही लोकांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर आरोप होता की, या लोकांनी असा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावरून दंगल भडकली होती. त्यामुळे तुम्हाला अशा व्हिडिओ पासून दूर राहायला हवे.
वाचाः येतोय पारदर्शक Nothing Phone 2 स्मार्टफोन, किंमत-फीचर्स जाणून घ्या