Jio चा जबरदस्त प्लान ! ३ महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय-स्पीड डेटा, किंमत नाही जास्त

नवी दिल्ली: Validity Plans:दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओकडे भारतात सर्वाधिक ग्राहक आहेत आणि त्यांचे प्रीपेड प्लान्स इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त देखील आहेत. खास गोष्ट म्हणजे जिओ यूजर्सना ३ महिन्यांसाठी सर्वात स्वस्त प्लानसह रिचार्ज करण्याचा पर्याय आहे. परंतु, हा प्लॅन एक सिक्रेट प्लान असून अॅप विशेष रिचार्ज प्लान आहे आणि इतर प्लॅटफॉर्मवर लिस्ट नाही. सहसा २८ दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड प्लान्ससाठी ग्राहकांना सरासरी २०० रुपये खर्च येतो, परंतु ४०० रुपयांपेक्षा कमी, जिओचा ‘अ‍ॅप-एक्सक्लुझिव्ह’ प्लान तीन महिने किंवा अगदी ८४ दिवसांची वैधता ऑफर करतो. या प्लानसह रिचार्ज करण्यासाठी युजर्सना My Jio अॅपची मदत घ्यावी लागेल. मात्र, त्याचा दैनंदिन डेटाचा लाभ मिळत नाही.

वाचा: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा, फेब्रुवारीत येताहेत हे दमदार स्मार्टफोन्स

प्लानमध्ये हे फायदे:

जिओच्या अॅप-एक्सक्लुझिव्ह परवडणाऱ्या प्रीपेड प्लानची किंमत ३९५ रुपये आहे. या किंमतीत यूजर्सना ८४ दिवसांची वैधता मिळते. तसेच, हा प्लान संपूर्ण ८४ दिवसांच्या वैधतेसाठी 6GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. यामध्ये, सर्व नेटवर्कवर एकूण १००० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा पर्याय देखील ग्राहकांना दिला जातो.

वाचा: Bluetooth डिव्हाइसशी कनेक्ट होत नसेल तर बदला ‘या’ सेटिंग्स

कोणत्या युजर्ससाठी हा प्लान चांगला:

या प्लानमध्ये दैनंदिन डेटा उपलब्ध नाही, म्हणजेच दररोज १-२ GB इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांसाठी या प्रीपेड प्लानचा काहीच उपयोग नाही. जर तुम्ही अशा युजरपैकी एक असाल ज्यांच्या घरी किंवा कार्यालयात वायफाय आहे आणि मोबाइल डेटाऐवजी तुम्ही बहुतेक वेळा वायफायशी कनेक्ट केलेले असाल तर, तुमच्यासाठी यापेक्षा चांगला प्लान असू शकत नाही. केवळ कॉलिंगसाठी हा सर्वात स्वस्त दीर्घ वैधता रिचार्ज प्लान आहे.

अशा प्रकारे रिचार्ज करू शकता:

तुम्हाला प्रथम तुमच्या फोनवर My Jio अॅप इंस्टॉल करावे लागेल आणि तुमच्या Jio नंबरने लॉग इन करावे लागेल. मेनूच्या तळाशी असलेल्या रिचार्ज पर्यायावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला प्लान्सची यादी दिसेल. येथे डावीकडे स्वाइप केल्यानंतर तुम्हाला ‘व्हॅल्यू’ रिचार्ज प्लॅन निवडावे लागतील, ज्यापैकी तुम्ही ३९५ रुपयांच्या प्लानवर टॅप करून रिचार्ज करू शकाल.

वाचा: Disney+ Hotstar साठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही, पाहा हे प्लान्स, सुरुवातीची किंमत १५१ रुपये

Source link

data plansjiojio appjio plansunlimited calling
Comments (0)
Add Comment