WhatsApp चे कूल फीचर, ऑटोमॅटिक हाइड होणार Photos-Videos , पाहा सेटिंग्स

नवी दिल्ली: WhatsApp Media: व्हॉट्सअॅपचा वापर जगभरातील लोक मोठ्या संख्येने करतात. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक फीचर्स मिळतात, ज्या च्या मदतीने, तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर असतानाही त्यांच्याशी कनेक्ट राहू शकता. म्हणूनच अनेक जण देखील आता सामान्य फोन कॉल्सऐवजी व्हॉट्सअॅप कॉल करायला लागले आहेत. प्लॅटफॉर्म एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येतो. यावर लोक सर्व फोटो आणि व्हिडीओ पाठवतात आणि त्यामुळे अनेक वेळा गॅलरीत लोकांचे खाजगी फोटोही दिसतात. व्हॉट्सअॅपवरून एखादा व्हिडिओ किंवा फोटो डाऊनलोड होताच तो युजर्सच्या फोन गॅलरीत दिसायला लागतो.

वाचा: धुमाकूळ घालायला येताहेत OnePlus चे स्वस्त इयरबड्स, बॅटरी लाईफ असेल ३६ तासांपर्यत

सेटिंग बंद करणे आवश्यक आहे:

तुम्ही ते थांबवू शकता. म्हणजेच तुमच्या व्हॉट्सअॅपचे फोटो आणि व्हिडिओ ऑटोमॅटिक गॅलरीमध्ये दिसणार नाहीत. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील.

वाचा: Disney+ Hotstar साठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही, पाहा हे प्लान्स, सुरुवातीची किंमत १५१ रुपये

यासाठी तुम्हाला मीडिया व्हिजिबिलिटी बंद करावी लागेल. याच्या मदतीने तुमच्या फोन गॅलरीत फोटो आणि व्हिडिओ आपोआप सेव्ह होणार नाहीत. म्हणजेच ते डाउनलोड केले जाईल. परंतु, गॅलरीत सेव्ह केले जाणार नाही. हे फीचर नवीन मीडियासाठी काम करेल. आधीच डाउनलोड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. तुम्ही वैयक्तिक चॅटसाठी किंवा ग्रुप चॅटसाठी हे फीचर बंद करू शकता.

सेटिंग कशी असेल?

यासाठी तुम्हाला आधी व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. येथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. तुम्हाला चॅट्सचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. येथे Media Visibility चा पर्याय मिळेल. तुम्ही तो बंद करू शकता. तुम्ही हे सेटिंग वैयक्तिक चॅट किंवा ग्रुपसाठी देखील बंद करू शकता. यासाठी तुम्हाला चॅटवर जाऊन कॉन्टॅक्ट इन्फोवर क्लिक करावे लागेल. येथे दर्शविलेल्या Media Visibility चा पर्याय बंद करावा लागेल.

वाचा: WhatsApp चे नवीन व्हिडिओ मोड फीचर आहे बेस्ट, युजर्सना असा करा येईल वापर

Source link

automatic hideWhatsAppWhatsApp featuresWhatsApp media visibilityWhatsApp photosWhatsApp videos
Comments (0)
Add Comment