Budget 2023 : डिजिटल इंडियाला मोदी सरकारची भेट, मोबाइल पासून स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत २०२३-२४ चे बजेट सादर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण याच्या कार्यकालातील हे पाचवे आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील हे अखेरचे बजेट आहे. अर्थमंत्री यांनी आज बजेट सादर करताना काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. कॅमेरा लेन्ससह काही कंपोनेंट्स वरील सीमा शुल्क कमी केले जाणार आहे. मोबाइल फोन्सला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच लिथियम आयन बॅटरच्या इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा आता स्वस्त होणार आहेत.

मोबाइल आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त
इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एक खास भेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, मोबाइल प्रोडक्शन ५.८ कोटी यूनिट पर्यंत वाढले आहे. कॅमेरा लेन्स, पार्ट्स आणि बॅटरीच्या आयातीवरील आयात शुल्क कमी केले जाणार आहे. याशिवाय, टीव्ही पॅनेलच्या आयात शुल्कला सुद्धा २.५ टक्के कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइल आणि स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. तसेच कॅमेरा लेन्स आणि बाकीच्या काही कंपोनेंट्स वर सीमा शुल्क कमी केले जाणार आहे. मोबाइल फोन्सच्या विक्रीला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा

या महत्त्वाच्या घोषणा

  • सर्वसामान्यांना दिलासा; सात लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त

  • प्राप्तिकर रचनेत १५ लाखांहून अधिकच्या मिळकतीसाठी ३० टक्के कर

  • सोने, चांदीचे दागिने महागणार, तर, मोबाइल फोन स्वस्त होणार

  • मोबाइल फोननिर्मितीत वाढ व्हावी यासाठी मोबाइलच्या काही भागांना कस्टम ड्युटीतून वगळणार

  • देशात मोबाईल हँडसेटच्या उत्पादनात मागील वर्षात मोठी वाढ, मोबाईलच्या काही घटकांवर सीमाशुल्कात घट

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

Source link

2023 budgetbudget 2023budget 2023 expectationsbudget 2023 latest newsbudget 2023 livebudget 2023 newsbudget session 2023mobile will be cheaperunion budget 2023
Comments (0)
Add Comment