सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या गाण्याला राज्य गीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला, तो एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्याचे अधिकृत राज्य गीत नाही. आता राज्य गीताला मान्यता मिळाली आहे. याबाबत मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला प्रेरणा देणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य म्हणून स्वीकारण्यात येत आहे.
हे वाचा-टीव्हीच्या संस्कारी सुनेचा दबंग अवतार! मुंबईच्या रस्त्यावर तुफान वेगात पळवली बाइक
केदार शिंदे यांनी त्यांचे आजोबा शाहीर साबळेंसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आणि लांबलचक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या केदार यांची ही लेटेस्ट पोस्टही चर्चेत आली.
केदार लिहितात की, ‘My real Hero- महाराष्ट्र शाहीर साबळे. बाबा, तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावात निर्माण होतोय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं. तुमच्या मनात खरच ही इच्छा असणार. १९६० पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलं. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील.’
हे वाचा-महेश मांजरेकरांचं घातलं प्रतीकात्मक श्राद्ध; ‘त्या’ वक्तव्यामुळे जोरदार घोषणाबाजी
एप्रिल महिन्यात केदार यांचा नवा सिनेमा येतोय. ज्यामध्ये शाहीर साबळेंची जीवनगाथा मांडण्यात येणार आहे. याविषयली लिहिताना पोस्टमध्ये केदार पुढे म्हणाले की, ‘या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनेमा सुध्दा येईल. आत्मा जागृत असतो. आणि तो जे आपल्याला हवं ते करून घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. २८ एप्रिल रोजी जेव्हा तमाम जनता सिनेमा पाहील आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करेल, तेव्हाच मी जन्माला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल.’ ही पोस्ट शेअर करताना त्यांनी #MaharashtraShaheer28April2023, #महाराष्ट्रशाहीर, MaharashtraShaheer असे हॅशटॅगही वापरले आहेत.