शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण’ सिनेमाने रिलीजच्या सातव्या दिवशीही एक नवा विक्रम रचला. हा सिनेमा ३०० कोटींचा आकडा गाठणारा हिंदीतील पहिला सिनेमा ठरला आहे. हा आकडा गाठण्यासाठी ‘बाहुबली २’ ला १० दिवस लागले होते, तर ‘पठाण’ने अवघ्या सात दिवसांत ३१६.०५ कोटी रुपये कमावले आहेत.
शाहरुख खानच्या ‘पठाण’चे सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आश्चर्यकारक आहेत. मंगळवारीही या सिनेमाने देशभरात कमाईचा मोठा विक्रम केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, सातव्या दिवशी हिंदी पट्ट्यात २१ कोटी रुपये कमावले, ज्यामुळे सिनेमाने देशभरात ३१६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
KGF 2 सिनेमाला टाकलं मागे
जरी आपण मूळ हिंदी सिनेमांशी या आकड्याची तुलना केली तरी, मागील कोणत्याही सिनेमाने सात दिवसांत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची कमाई केलेली नाही. तर सात दिवसांच्या कमाईनुसार, बॉक्स ऑफिसवर KGF 2 ने ६५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
दिल्ली/यूपीच्या लोकांमध्ये प्रचंड क्रेझ
सोमवारच्या तुलनेत मंगळवारची कमाई १५ टक्के कमी असली तरी ‘पठाण’ने महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या कमाईला मागे टाकले आहे. कमाई घसरली असूनही व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला. उत्तर प्रदेशच्या चित्रपटगृहांमध्ये पठाण सर्वात जास्त चालत आहे. दिल्ली/यूपीच्या पट्ट्यात शाहरुखची प्रचंड क्रेझ आहे.
जगभरातील पठाणचं कलेक्शन
सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘पठाण’चे बजेट २५० कोटी रुपये आहे. जगभरातील कमाईचा विचार केला तर या सिनेमाने सहा दिवसांत जगभरात ५९१ कोटींची कमाई केली. म्हणजेच सातव्या दिवशी सिनेमा जगभरात ६०० कोटी क्लबचा भाग झाले. सिनेमा परदेशात २ हजार ५०० स्क्रीनवर दाखवला जात आहे. यापैकी सर्वाधिक कमाई अमेरिका/कॅनडा, न्यूझीलंड, आखाती देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे.
३०० कोटींचा टप्पा गाठणारा सिनेमा
‘पठाण’ देशभरात ५ हजार ५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. बुधवारी रिलीज झाल्यामुळे, त्याला पाच दिवसांचा वाढीव वीकेंड मिळाला. याशिवाय शाहरुखच्या सिनेमाने रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ जानेवारीला देशातील राष्ट्रीय सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. ३०० कोटींचा आकडा गाठणाऱ्या सर्वात वेगवान भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘पठाण’ पहिल्या क्रमांकावर आहे.