Technology Budget 2023 : स्मार्टफोन सेक्टरपासून AI पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्लीः Technology Sector Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत केंद्रीय बजेट २०२३ सादर केले आहे. या बजेट मध्ये टेक्नोलॉजी साठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आजच्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या घोषणे नंतर टेक्नोलॉजी मध्ये काय काय बदल होणार आहेत, सविस्तर जाणून घ्या.

५जी साठी १०० लॅब्स
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ५जी विकासासाठी सरकार संपूर्ण देशात जवळपास १०० लॅब्सची स्थापणा करणार आहे. यामुळे ५जी ची सेवा डेव्हलप होण्यास मदत मिळणार आहे. आता पर्यंत संपूर्ण देशात १०० हून अधिक शहरात एअरटेल आणि जिओ ५जी सर्विस लाइव्ह करण्यात आली आहे.

टीव्ही पॅनेलच्या ओपन सेलवर सीमा शुल्क
नवीन बजेट मध्ये ओपन सेल वर शुल्क मध्ये कटोती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पॅनेल बाजाराच्या सोबत प्रतिस्पर्धा करण्यास मदत मिळणार आहे. मोठ्या आकाराच्या टीव्हीसाठी जीएसटी मध्ये नेमका काय बदल केला आहे, हे अजून स्पष्ट नाही.

स्मार्टफोन निर्मात्यांना दिलासा
या नवीन बजेट मध्ये सांगितले की, कॅमेरा लेन्स, लिथियम बॅटरीसाठी काही इनपूटसाठी सीमा शुल्क मध्ये मदत आणखी एक वर्षासाठी जारी राहिल.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

नॅशनल डिजिटल लायब्रेरी रिसोर्स
नवीन बजेट मध्ये शिक्षणाला टेक्नोलॉजीने जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकार डिजिटल इंडियाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षणाचे डिजिटलीकरण करण्यात मदत करणार आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा

डिजिलॉकर अपडेट
डिजिलॉकर आता आणखी डॉक्यूमेंट्सला सपोर्ट करणार आहे. गरज पडल्यास डॉक्यूमेंट्सला स्टोर करणे, आणि शेअर करण्यासाठी वापर केला जाणार आहे.

वाचाः Budget 2023 : डिजिटल इंडियाला मोदी सरकारची भेट, मोबाइल पासून स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त

वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

Source link

budget 2023 updatesbudget newsindian budget 2023nirmala sitharaman budget 2023Technology Budget 2023Union Budgetunion budget 2023
Comments (0)
Add Comment