पालघर जिल्ह्यातील डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरी येथे अॅलेस विनय लखन हा इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.
हेही वाचा – ३ महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न, मात्र पती आणि सासूसोबत वाद; २१ वर्षीय अंजलीने स्वत:ला संपवलं
वस्तीगृहाच्या बाथरूममध्ये आज अचानक ॲलेसचा लटकलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांनी व वस्तीगृह व्यवस्थापनाने या विद्यार्थ्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा – घंटागाडीत फेकले तेरा तोळे सोनं; कागदी ताटात दागिने गुंडाळून ठेवल्याने गोंधळ, नंतर घडलं असं…
मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तलासरी तालुक्यातील सावरोळी- उधानपाडा येथील ॲलेस हा रहिवासी आहे. आत्महत्येआधी त्याने आपल्या हातावर ‘ॲलेस डेथ आणि व्हॉट आय डू?’ असे लिहिलं असल्याचे कळते.
हेही वाचा – ३२ वर्षीय विवाहित महिलेचं १५ वर्षीय मुलाला दारू पाजत धक्कादायक कृत्य…
या घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली आहे. प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून ॲलेसने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.