मुंबई: सन २०२३-२४चा अर्थसंकल्प आज, बुधवारी संसदेत सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेटमधून सर्वसमान्यांना दिलाला देण्याचा प्रयत्न केलाय.महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर करदात्यांनाही दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे कर प्रणालीत करण्यात आलेला मोठा बदल.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिग्दर्शक आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी अर्थसंकल्पावर ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.
काय आहे विवेक अग्निहोत्री यांचं हे ट्विट?
स्लॅब पाच लाखांवरून सात लाखांवर करण्याचा सगळ्यात भारी निर्णय.
काय आहे हा कर प्रणालीतला नवीन बदल?
अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीअंतर्गत आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तर स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय आता ९ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ ४५ हजार रुपयाचा तर १५ लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर १.५ लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे.