हे वाचा-महाराष्ट्रातील बडा नेता शिव ठाकरेच्या पाठीशी; थेट फेसबुक पोस्ट करत केलं कौतुक
काय म्हणाला स्वप्निल जोशी?
स्वप्निल सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतो. सध्या ‘वाळवी’ सिनेमाच्या निमित्ताने तो अधिकाधिक पोस्ट ट्विटर त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवर शेअर करतो. शिवाय विविध विषयांवर तो त्याची मतही मांडतो. आता अभिनेत्याने बजेटविषयी एक मार्मिक ट्वीट केले. स्वप्निलने असे लिहिले की, ‘…आज सगळेच experts आहेत!’ #Budget असा हॅशटॅगही स्वप्निलने या ट्वीटमध्ये वापरला. अर्थात त्याने अशा लोकांना टोला लगावला आहे जे माहिती नसतानाही बजेटविषयी चर्चा करतात किंवा त्याविषयी सल्ले देतात.
हे वाचा-‘सिनेमा पहिलं प्रेम पण राहाला प्राधान्य’, चित्रपटातील कामाविषयी आलियाचा निर्णय!
स्वप्निलाच्या या मजेशरी पोस्टवर चाहत्यांनीही मजेशीर रिप्लाय दिले. एकाने असे लिहिले की, ‘त्यातले किमान ९० टक्के लोक आयकर भरत नसतील’, अन्य एकाने लिहिले की, ‘तू पण हो एक्सपर्ट’. स्वप्निलच्या हे ट्वीट शेकडो युजर्सनी लाइक केले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
टॅक्स स्लॅबमध्ये करण्यात आलेली कपात ही आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा आहे. ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार असल्याची ही घोषणा आहे. आणखी एक घोषणा म्हणजे सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्डचा वापर आता कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणाही यावेळी करण्यात आली. तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा १५ लाखावरुन ३० लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून मासिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा ४.५ लाखांवरून ९ लाखांपर्यंत वाढवली आहे. दरम्यान काय महागणार असा सवालही सर्वसामान्यांपुढे होता. सोने, चांदी आणि प्लॅटिनम महागणार आहे. सिगरेटवरील कस्टम ड्युटी वाढवल्याने सिगरेटच्या दरातही वाढ होणार आहे.