बॉयकॉट पठाण ट्रेंडवर पहिल्यांदाच बोलले सिनेमाचे दिग्दर्शक; म्हणाले- ‘शाहरुख नेहमीच सॉफ्ट टारगेट’

मुंबई: पठाण सिनेमाला जे यश मिळालं आहे, त्यामुळे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद प्रचंड आनंदित झाले आहेत. सिनेमात शाहरुख खान गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. तसंच सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. पठाण सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याला कडाडून विरोध झाला होता. इतकंच नाही तर सिनेमावर बहिष्काराची मोहीम सोशल मीडियावर राबवण्यात आली होती. त्यावेळी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. परंतु आता सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सिद्धार्थ आनंद यांनी पहिल्यांदा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले सिद्धार्थ आनंद

सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं की, ‘पठाण सिनेमावर ज्यांनी बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा तो पाहणाऱ्या येणाऱ्यांची संख्या अधिक आहेत. त्यांनी आम्हा सर्वांना पाठिंबा दिला आहे. मला असं वाटतं की ज्याच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे, त्यात काही तरी विरोध करण्यायोग्य काही तरी गोष्टी असायला हवी. पठाण सिनेमावर बहिष्कार घालण्याची जी कारणे दिली आहेत ती अत्यंत हास्यास्पद आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांनी सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचा निर्णय दिला आहे.’

हे वाचा-केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला- ‘आता सगळेच…’

सिद्धार्थ आनंद यांनी पुढं सांगितलं की, ‘शाहरुख खान हा कायम सॉफ्ट टार्गेट राहिलं आहे. परंतु प्रेक्षकांनी त्याला जो भरभरून पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच पठाण सिनेमाला इतकं घवघवीत यश मिळालं आहे. ते सिनेमावर फक्त प्रेम करतात.. त्याला जज करत नाही.’ पठाण सिनेमातून सुपरस्टार शाहररुख खान यानं चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दणदणीत पुनरागमन केलं आहे.

शाहरुख आणि टॉम क्रुझची तुलना

सिद्धार्थ यांनी शाहरुख खान आणि टॉम क्रुझ यांची तुलना केली आहे. ते म्हणाले की,’ प्रत्येकाला माहिती आहे की,टॉम क्रुझ अभिनय करतो. परंतु मोठ्या पडद्यावर तो ज्या पद्धतीनं स्वतःला सादर करतो तेच प्रेक्षकांना बघायचं असतं. तसंच शाहरुखच देखील आहे. त्यामुळेच पठाण सिनेमासाठी आम्ही शाहरुखची निवड केली. त्याला आम्ही गाणे दिले, अॅक्शन सीन करायला दिले कारण प्रेक्षकांना देखील हेच बघायचं आहे.’

हे वाचा-महाराष्ट्रातील बडा नेता शिव ठाकरेच्या पाठीशी; थेट फेसबुक पोस्ट करत केलं कौतुक

पठाण सिनेमानं एका आठवड्यात हिंदी सिनेमांचे अनेक विक्रम तोडले आहेत. सिनेमानं भारतामध्ये ३०० कोटी रुपये आणि जगभरातून ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. उत्तर अमेरिकेत या सिनेमानं एका आठवड्यात १० मिलीयन डॉलर्सहून अधिक कमाई केली आहे. सिनेमाची ही कमाई ऑस्करमध्ये नॉमिनेट केलेल्या सिनेमांच्या कमाईहून अधिक आहे.

Source link

pathaan moviepathaan movie boxoffice collectionpathaan movie controversypathaan movie successshah rukh khansiddharth anandSiddharth Anand on Boycott Pathaan Trendपठाण सिनेमापठाण सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शनशाहरुख खान
Comments (0)
Add Comment