शिवभक्ताची किमया! बनवली आशिया खंडातील सर्वात लहान तोफ, करंगळीच्या नखावर सहज मावते

औरंगाबाद : इतिहासाची प्रचंड आवड, शिवकालीन शस्त्रे, त्या काळात वापरलेल्या वस्तूंप्रती आकर्षण व विविध वस्तू बनविण्याचा छंद असलेल्या औरंगाबादच्या विठ्ठल गोरे या व्यावसायिकाने चक्क करंगळीच्या नखाच्या एकतृतियांश भागात मावेल अशी खरीखुरी तोफ बनविली आहे. या तोफेची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. या पूर्वी देखील अनेक वस्तू गोरे यांनी बनविल्या असून लंडन येथे असलेल्या जगदंबा तलवारी सारखी तंतोतंत मोजमाप असलेली तलवार ते बनवीत आहेत. शिवाय जगातील सर्वात मोठे शिवकालीन शत्र बनविण्याचेही त्यांचे नियोजन आहे

गोरे हे व्यवसायिक आहेत. त्यांचे औरंगाबादेतील चिकलठाणा येते एक वर्कशॉप आहे. तेथे ते वेगवेगळे यंत्र बनवितात. एखाद्या इंजिनिअर प्रमाणे ते वर्कशॉपमध्ये काम करतात. मात्र त्यांचं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. ते एक शिवभक्त असून लहानपणापासून त्यांना गडकिल्ले पाहण्याची, फिरण्याची आवड. त्यासह शिवकालीन शस्त्रे, वस्तूंबाबत विशेष आकर्षण आहे. मात्र व्यवसायिक झाल्यानंतर त्यांना पूर्वीप्रमाणे वेळ मिळत नसे. मिळालेल्या वेळेत ते मित्रासह गड किल्ले भ्रमंती करतात. गडकिल्ल्यात असलेल्या एतिहासक तोफा पाहून ते त्यांना न्याहळयचे. एकीकडे शिवकालीन शास्त्रांकडे आकर्षण तर दुसरीकडे इंजिनिअरिंगची आवड या दोन्ही गोष्टींची सांगड घालत गोरे यांनी तोफ बनविण्याचे ठरविले. सन २०१३ मध्ये गोरे यानी पहिली तोफ बनविली ती तोफ ४ ते ५ इंचांची होती. त्यांनी यानंतर अनेक तोफा स्वतः बनविल्या. त्यांनी आतापर्यंत सर्वात मोठी तोफ २६ किलो वजनाची बनविली आहे.

क्लिक करा आणि वाचा- तो जिवंत असेल ही आशाच नव्हती; अडीच वर्षांनंतर मुलगा सापडला, वडिलांनी कडकडून मिठी मारली, फुटला अश्रूंचा बांध

अशी बनविली लहान तोफ, आशियातील सर्वात लहान तोफेचा मिळाला मान

गोरे यांनी माहिती घेतली असता आता पर्यंतची सर्वात लहान तोफ जयपूर मध्ये असून ती एका गृहस्थाने बनविल्याचे त्यांना समजले. यापूर्वी अनेक तोफ बनविण्याचे अनुभव असल्याने त्यांनी सर्वात लहान तोफ बनविण्याचे ठरविले. आणि ते यशस्वी झाले. गोरे यांनी बनविलेली तोफेला आशियातील सर्वात लहान तोफ असल्याचा मान मिळाला आहे. याची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून या तोफेची लांबी ५ मिलिमीटर आहे, तर उंची २.७ मिलिमीटर आहे आणि रुंदी साडेतीन मिलिमीटर असून या तोफेचे वजन अवघे १४० मिलिग्राम आहे. ही तोफ तांबे आणि पितळ या दोन धातूचा वापर करून बनविण्यात आली आहे. तोफ बनविण्यासाठी ०.३ आकाराचे विशेष ड्रिल व खास सूक्ष्मदर्शीचा वापर करून एका महिन्याच्या अथक परिश्रमानंतर बनविण्यात आली आहे. ही फक्त शोभेसाठी नसून या तोफेमध्ये स्फोटक भरून मारा ही करता येतो.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! रागाच्या भरात त्याने कंडोम गळून टाकलं, त्यात होतं केळं, २४ तासांत घडलं भयंकर… डॉक्टरही उडाले

मोडी आणि ब्रह्मी लिपीचा देखील ज्ञान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोडी लिपीचा वापर केला जायचा. त्यामुळे गोरे यांनी मोडी लिपी शिकून घेतली. शिवाय ब्रह्मी लिपीचे ज्ञान घेतले. कोरोना काळात त्यांनी अनेक इतिहास प्रेमींना या दोन्ही भाषा शिकविल्या.आजही अनेक जण मोडी लिपी शिकण्यासाठी त्यांच्याकडे येतात. व्यवसाय सांभाळून ते छंद जोपासतात. त्यांनी बनविलेली शिवकालीन शस्त्रे पाहण्यासाठी नेहमी त्याकडे शिवप्रेमींचा गराडा असतो.

क्लिक करा आणि वाचा- मंगळ ग्रहावर कोणी बनवला अस्वलाचा चेहरा?; विचित्र आकृती पाहून शास्त्रज्ञांचीही उडाली झोप, पाहा काय आहे सत्य

वाघनखे बनविली, आता जगदंबा तलवारीचे काम सुरू

लंडन येथील म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार व वाघनखे आहेत. शिवरायांनी वापरलेली वाघनखाची लांबी,रुंदी अकार ज्या प्रमाणे आहे त्याच प्रमाणे हुबेहूब वाघनखे गोरे यांनी बनविले आहे. आता त्यांनी महाराजांच्या जगदंबा तलवारीसारखी दिसणारी तलवार बनविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी इतिहास संशोधकाकडून जगदंबा तलवारी बाबतची सर्व माहिती घेतली आहे. लवकरच ही तलवार पूर्ण होणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

Source link

aurangabad newsDevotee of Chhatrapati Shivaji MaharajSmallest cannon in asiaVitthal Goreतोफविठ्ठल गोरेशिवभक्तशिवभक्ताने बनवली सर्वात लहान तोफ
Comments (0)
Add Comment