बॉलिवूडमधील कलाकारांबरोबर त्यांची मुलं देखील चर्चेत असतात. तशीच चर्चा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची देखील असते. खरं तर आर्यन सोशल मीडियावर फारसा नसतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची अनेक नेटकऱ्यांना उत्सुकता असते. त्यामुळे जिथं आर्यन जातो तिथं फोटोग्राफर्स देखील असतातच. अनुराग कश्यप याच्या ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत सिनेमाच्या स्क्रिनिंगला आर्यन देखील आला होता. परंतु त्यावेळी त्यानं जे काही केलं त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
हे वाचा-केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला- ‘आता सगळेच…’
काय घडलं नेमकं
सिनेमाच्या स्क्रिनिंगला आलेल्या आर्यन खान यानं तिथं असलेल्या फोटोग्राफर्सकडे दुर्लक्ष केलं. फोटोग्राफर्सनं आर्यनला हाक मारत फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली परंतु त्यानंतरही आर्यननं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून तो निघून गेला. ही गोष्ट पापाराझींना आणि काही नेटकऱ्यांना आवडलेली नाही. एका व्हिडिओमध्ये पापाराझी आर्यनला असं म्हणताना ऐकू येतायंंत की, ‘सर तुम्ही कायम दूर्लक्ष करता’.
हे वाचा- महाराष्ट्रातील बडा नेता शिव ठाकरेच्या पाठीशी; थेट फेसबुक पोस्ट करत केलं कौतुक
त्यावरून अनेकांनी आर्यनची शाळा घेतली. तर काहींनी आर्यनला पाठिंबाही दिला आहे. त्यांच्यामते आर्यनला जाणिवपूर्वक त्रास देत आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, ‘मुलगा आता मोठा झाला आहे. पूर्ण अॅट्यिटूड आहे याच्यात’ तर आणखी एकानं लिहिलं की, ‘केवळ किंग खानमुळे त्याला इतकी प्रसिद्धी आणि आदर मिळत आहे.’ तर आणखी एकानं लिहिलं आहे की,’ तो इतका बेजवाबदार आहे तरी फोटोग्राफर्स त्याचे फोटो का घेत आहेत. काय गरज आहे.’ अशाप्रकारे जरी काहींनी ट्रोल केले असले तरी काहींनी आर्यनला पाठिंबाही दिला. जर त्याला फोटो काढायचे नसतील तर पापाराझी का असं वागतात, असा सवालही काही युजर्सनी विचारला.
सिनेमाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यामध्ये जावेद अख्तर, शबाना आजमी, राधिका आपटे, हुमा कुरैशीसह यांचा समावेश होता. सिनेमाच्या स्क्रिनिंगला आलेल्या सर्व कलाकारांनी तिथं असलेल्या फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोझही दिल्या परंतु आर्यन खान यानं मात्र फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोज न दिल्यानं त्याच्यावर टीका होत आहे. आर्यनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.