हायलाइट्स:
- देशातील १० राज्यात करोनारुग्णवाढ
- महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश
- तिसऱ्या लाटेचे संकेत
नागपूरः राज्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिर असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं राज्यात निर्बंधांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाहीये. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऑगस्टअखेरीस करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं निर्बंधांतून सूट मिळण्याची शक्यता धुसर होत चालली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सहा ते सात हजारांच्या घरात आहे. तसंच, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने खाली घसरत आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अजूनही रुग्णवाढीचा दर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं राज्य शासना सावधगिरीने पावलं उचलत आहेत.
वाचाः एटीएम फोडताना पोलिसांनी रंगेहात पकडले; बँक अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या घटली असली तरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं निर्बंधांबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाहीये, केवळ चर्चा झालीये, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
वाचाः मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार लोकलमुभा
निर्बंध शिथील करण्याबाबत अंतिम निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री घेणार आहे. देशातील १० राज्यात रुग्णवाढ होत आहे. त्यात महाराष्ट्राचादेखील समावेश आहे. करोना अद्याप संपलेला नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
वाचाः ही पेंग्विनची सेना, शिवसेनेतील बाटग्यांची यादी मोठी; राणेंचा शिवसेनेवर पलटवार