सुनील यांनी सोशल मीडियावर ही बातमी दिली. ‘छोटेखानी समारंभात हा विवाहसोहळा संपन्न झाला. मी आता अधिकृतपणे सासरा झालो,’ अशा शब्दांत सुनील शेट्टी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करीत लेक आणि जावयाला आशीर्वाद दिले. सुनील यांच्या खंडाळा इथल्या फार्महाउसवर हा सोहळा झाला.
लग्नानंतर अथिया मुंबईत स्पॉट झाली होती. एकदा ती एका पार्लरच्या बाहेर स्पॉट झाली होती होती, तर नुकतीच ती राहुलसोबत डेटवर गेली, तेव्हा कॅमेऱ्यात कैद झाली होती.लग्नानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तिचे फोटो व्हायरल झाले होते. याफोटोत ती कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसली होती. हे फोटो पाहून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. नवीन लग्न झाल्यासारखं वाटत, नाही नवी नवरी अशी असते, का वगैरेच्या कमेंट्स आल्या होत्या. पण आता चर्चा सुरू झाली आहे ती, नववधू अथियाच्या मंगळसूत्राची.
अथिया आणि राहुल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओ या नवीन जोडप्याचा खूपच रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळत आहे. पण आणखी एका गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे अथियाच्या गळ्यातल्या मंगळसूत्रानं. तिच्या या मंगळसूत्राची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
लाल रंगाच्या एका इंडोवेस्टर्न ड्रेसमध्ये अथिया खुपच सुंदर दिसत आहे. तिनं गळ्यात हिऱ्यांत चोकर घातलंय. पण मंगळसूत्रानं तिचं सौंदर्य आणखी खुलवलं आहे. तिचं हे मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आलं आहे.