अकोला शहरातील जवाहर नगर भागात १५ ते २० कॅफे आहेत, त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना कसे आकर्षित करतील यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. अनेक कॅफे व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी अतिरिक्त सोयसुविधा पुरवल्या असल्याचं समोर आलं आहे. कॅफे चालक हे ग्राहकांकडून दोन ते तीन हजार रुपये अतिरिक्त घेऊन, त्यांना स्पेशल कॅबिन ज्याला पडदे लावलेले असतात. त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नाही, अशा ठिकाणी अल्पवयीन मुलं- मुलींसह तरुणाई मोठ्या प्रमाणात जाते. या प्रकारला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महिलांनी आमदार नितीन देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देत तक्रारी मांडल्या. महिन्याभरापूर्वी शिवसेनेच्या महिला आघाडीने कॅफे विरोधात आक्रमक भूमिका घेत पोलिसांसह कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा हे प्रकार सुरू झाले. हे प्रकार रोखण्यासाठी आज शिवसेना आमदार नितीन देशमुख रस्त्यावर उतरले.
मोदींच्या टीममध्ये मानाचं स्थान,पण पती भाजपचे कडवे टीकाकार, निर्मला सीतारामन यांचा राजकीय प्रवास
नितीन देशमुख पोहचले थेट कॅफेत
आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास आमदार नितीन देशमुख जवान नगर भागातील एका कॅफेवर चहा पिण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख गोपाल दातकरसह शिवसेना शहरप्रमुख राहुल कराळेसह आदी पदाधिकारी होते. थोड्यावेळाने त्यांनी कॅफेची तपासणी केली. तपासणीत कॅफे मधील पडदे लावून पार्टीशन केलेल्या जागेत अल्पवयीन मुले-मुली एकांतात बसून असभ्य वर्तन व अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले. हा अतिशय लाजरवाणी प्रकार असल्याचेही आमदार देशमुख म्हणाले.
ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळेंची घराची परवड थांबणार, प्रहारकडून मदतीचा हात
या प्रकरणी कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. आमदार नितीन देशमुख यांनी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेतली. कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली. कायद्यातील कठोर कलमांन्वये कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी नितीन देशमुख यांना दिलं आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत हिंडेनबर्ग रिपोर्टवर चर्चा; आमदारांना आदेश आला; अधिवेशनात धमाका?
आमदार संग्राम थोपटेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद, फटकेबाजीनं जिंकली उपस्थितांची मनं