आता कोयता गँगचं काही खरं नाही; पुणे पोलिसांनी लढवली नवी शक्कल, गुन्हेगारी रोखण्यासाठी पाहा नवा प्लान

पुणे : पुणे शहराची विद्येचे माहेरघर अशी ओळख आहे. अशा पुण्यात गेले काही महिन्यात गुन्हेगारांचं आणि गुन्हाच प्रमाण सर्वधिक झालं आहे. पुण्यामध्ये काही महिन्यांपासून कोयता गॅंग कार्यरत झाली आहे. रोज एक नवा गुन्हा कोयता गँगच्या नावाने घडताना दिसत आहे. पूर्व पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १०० हून अधिक नामांकित व सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हे म्हणजे मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. तरी देखील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले नसून उलट ते दिवसंदिवस वाढत चालले आहे. म्हणून पुण्याचे नवे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या समोर या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मोठं आव्हान आहे. यासाठी आत अपर पोलीस विभागाच्या वतीने गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी नवीन शक्कल लढवण्यात अली आहे.

शहरात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी खालील प्रमाणे कारवाही केल्यास बक्षी देण्यात येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- ITR: Income Tax रिटर्न म्हणजे काय आणि ते भरण्याचे काय आहेत फायदे, अगदी सोप्या भाषेत समजून घ्या

१. शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार कारवाई – १० हजार रुपयांचे बक्षीस

२. शस्त्र अधिनियम कलम ४, ५ नुसार कारवाही – ३ हजार रुपये बक्षीस

३. फरार आरोपी पकडणे – १० हजार रुपये बक्षीस

४ पाहिजे असलेले आरोपी (WANTED) पकडणे – ५ हजार रुपये बक्षीस

५ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी ( मोक्का ) – ५ हजार रुपये बक्षीस

६ महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती विधायक कृत आळा एनपीडीपी – ५ हजार रुपये बक्षीस

७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार कारवाई केल्यास – २ हजार रुपये बक्षीस

८. महाराष्ट्र पोलीस कायदा ५६/५७ नुसार कारवाई केल्यास – १ हजार रुपये बक्षीस

क्लिक करा आणि वाचा- हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला, फसवा, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा; अजित पवारांची घणाघाती टीका

अशा कायदेशीर कारवाई केल्यास बक्षीस दिले जाणार आहे. पुणे पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी ही नामी शक्कल लढवली असली तरी ती किती उपययुक्त ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- शिवभक्ताची किमया! बनवली आशिया खंडातील सर्वात लहान तोफ, करंगळीच्या नखावर सहज मावते

Source link

koyta gangPune crimepune koyta gangPune newsPune Policeपुणे कोयता गँगपुणे पोलिसांची नवी शक्कलपुणे पोलीस
Comments (0)
Add Comment