बुलढाणा जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी एकनाथ घुगे यांना गरीब शेतकरी पुत्राकडून लाच घेताना पकडण्याची घटना होऊन एक महिना उलटला नसला तरी पुन्हा एकदा एक लाच खोरीचं प्रकरण समोर आलं आहे. आणखी एक सरकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. सरकारी कामांसाठी नागरिकांकडून पैसे घेत चिरीमिरी करण्याचे प्रमाण वाढत आहे. बुलढाणा जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढल्याचं सातत्यानं समोर येत आहे.
विवाह नोंदणी कागदपत्रांसाठी लाच
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील बोराखेडी गावच्या एका व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली होती. रामचंद्र गुलाबराव पवार हे ग्रामपंचायतीचे बोराखेडीचे ग्रामविकास अधिकारी चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारदारानं २००८ मध्ये ग्रामपंचायत बोराखेडी येथे विवाह नोंद केली होती. ती विवाह नोंद ज्या कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आली, ती कागदपत्रे मिळण्याकरीता तक्रारदारानं ग्रामविकास अधिकारी बोराखेडी यांना अर्ज दिला होता. त्या अर्जावरून माहिती देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र गुलाबराव पवार तक्रारदार यांचेकडे 4 लाख रुपये आणि साखरेचे एक पोते अशी लाच मागितली होती. तडजोडी अंती दोन लाखांची रक्कम निश्चित झाली होती.
मराठमोळ्या शिल्पकाराचे हात राम मंदिरातील मूर्तीला आकार देणार, शिळा दाखल; अयोध्येत काम सुरु
ग्रामपंचायत मधून कागदपत्रे देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांनं चार लाख रुपये रोख रक्कम मागितले होते तसेच एक पोते साखर द्यावी अशी मागणी केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यापैकी एक हजार रुपये त्याने फोन पे वर स्वीकारले होती. तडजोडीअंती दोन लाख हजार रुपये लाचेची रक्कम ठरली होती. लाच स्वीकारण्यासाठी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांनी तक्रारदाराला बुलढाणा ते चिखली रोडवरील, नागरे ठेकेदार यांचे बंगल्यासमोरील, गाळा क्र. 8, सुंदरखेड, बुलढाणा येथे बोलावले होते. तिथं लाचलुचपत प्रतिबंधक पथक बुलढाणा यांनी सापळा रसला आणि संबंधित लाचखोर ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
सचिन तेंडुलकर ठरला शुभमन गिलसाठी लकी, तिसऱ्या T20 सामन्यात रचला मोठा विक्रम
३१ जानेवारी रोजी सायंकाळी रात्री एसीबीच्या पथकाने ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार यांना लाच मागणीतील पडताळणीवेळी फोन पे द्वारे एक हजार रुपये आणि सापळा कारवाई वेळी लाचेचा पहिला टप्पा रूपये १ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधिकारी शाम भांगे, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, विनोद लोखंडे , सुनील राऊत, रवींद्र दळवी, स्वाती वाणी या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. ही कारवाई मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, देविदास घेवारे ,अपर पोलीस अधीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती,वसंजय चौधरी, पोलीस उपअधीक्षक, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गिलचे शतक फळलं… न्यूझीलंडचे पानीपत करत भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली