मुंबई : गुन्हा म्हटलं की शिक्षाही आलीच, आपण पाहिलं अनेक गुन्ह्यांमधल्या आरोपींना कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाते. मात्र, मुंबई उपनगरातील मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्ट २०२२ मध्ये एका अल्पवयीन मुलांनी घरफोडी केली होती. या घरफोडीतील विधीसंघर्ष बालकाला दररोज एक तास पोलीस ठाण्यात हजर राहून येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला मदत करणे, अशी अनोखी शिक्षा घरफोडीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे.
मुंबई उपनगर येथील मुलुंड रामगड येथे ऑगस्ट २०२२ रोजी चार मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणून पोलिसांनी १६ वर्षाच्या विधिसंघर्ष बालकला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची मालमत्ता जप्त केली होती.

विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी; किती वाजता लागणार निकाल? जाणून घ्या….
त्यानंतर त्याला बाल न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला कुटूंबियाच्या ताब्यात दिले होते. मुलुंड पोलिसांनी या गुन्ह्याचे आरोपपत्र पुन्हा नोव्हेंबर महिन्यात बाल न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने आरोपीने प्रथमच केलेल्या या गुन्ह्यात दोषी ठरवून २३ जानेवारी रोजी आरोपीला अनोखी शिक्षा सुनावली.
१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान आरोपीनी मुलुंड पोलीस ठाण्यात दररोज एक तास हजर राहून पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदार, जेष्ठ नागरिक, विकलांग नागरिकांना मदत करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना संबंधित अधिकारी यांच्यापर्यंत पोहचवणे, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लोकलमधील मोटरमन चक्कर येऊन केबिनमध्येच पडला; मालाड स्थानकातील घटनेमुळे उलटसुलट