गुगल मॅपवरुन रस्ता शोधताना अपघात; पुण्यात इंजिनिअर तरुणीचा जागीच मृत्यू

पुणेः गुगल मॅपवरुन रस्ता शोधण्याचा प्रयत्न दुचाकीवर मागे बसलेल्या एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. सिंहगडावर दुचाकीवरुन फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीने परतत असताना रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली होती. मात्र गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्याने ते महामार्गावर आले. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्याने ते वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात झाला.

रिदा इम्तियाज मुकादम (वय २३, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार नटराज अनिलकुमार (वय ३०, रा. वानवडी) जखमी झाला आहे. रिदा आणि नटराज खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत. ते दोघे सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते. त्यांना वानवडीला जायचे असल्याने ते गुगल मॅपवर रस्ता शोधत असताना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आले. दुचाकी चालवत असलेल्या नटराज आणि रिदा बाह्यवळणावरुन नवीन कात्रज बोगद्याकडे गेले. नंतर आपला रस्ता चुकल्याचे नटराजच्या लक्षात आले.

वाचाः युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन; दानवेंच्या घरासमोरील उपोषणाने राज्यभर आले होते चर्चेत
नवीन कात्रज बोगद्याजवळून वळण घेत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकची धडक दुचाकीला बसली. यामध्ये रिदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक न थांबता निघून गेला. याबाबत नटारज याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.

वाचाः लोकलमधील मोटरमन चक्कर येऊन केबिनमध्येच पडला; मालाड स्थानकातील घटनेमुळे उलटसुलट चर्चा

Source link

Pune Accident Newspune engineer girl diedpune girl died in accidentpune news todayपुणे अपघाती मृत्यूपुणे आजच्या बातम्या
Comments (0)
Add Comment