Bharti Airtel चे 5G नेटवर्क आता ५५ शहरात, पाहा संपूर्ण शहराची लिस्ट

नवी दिल्लीः भारती एअरटेल मोठ्या शहरात 5G नेटवर्कचा विस्तार करीत आहे. कंपनी भारतातील मोठ्या शहरात डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण शहरात आणि २०२४ पर्यंत संपूर्ण देशात रोलआउट करणार आहे. एअरटेलने 5G नेटवर्क ला आंध्र प्रदेशातील ७ शहरात लाइव्ह करण्यात आले आहे. यात विजयवाडा, राजहमुद्री, काकीनाडा, कुर्नूल, गुंटूर आणि तिरूपतीच्या लोकांना आता ५जी सेवा वापरता येणार आहे. यासोबत एअरटेलने आपल्या ५जी नेटवर्क सोबत ६० हून जास्त भारतीय शहरात ही सेवा पोहोचली आहे.

एअरटेलने ज्या जागी 5G नेटवर्क उपलब्ध केले आहे, त्या शहराची लिस्ट

– असम: गुवाहाटी
– आंध्र प्रदेश: विज़ाग, विजयवाड़ा, राजहमुन्द्री, काकीनाडा, कुर्नूल, गुंटूर आणि तिरुपती.
– बिहार: पटना, मुजफ्फरपुर, बोध गया आणि भागलपूर.
– दिल्ली.
– गुजरात: अहमदाबाद
– हरियाणा: गुरुग्राम, पानीपत आणि फरीदाबाद.
– हिमाचल प्रदेश: शिमला
– जम्मू आणि कश्मीर: जम्मू, श्रीनगर, सम्बा, कठुआ, उधमपूर, अखनूर, कुपवाड़ा, लखनपुर आणि खौर
– झारखण्ड: रांची आणि जमशेदपुर
– कर्नाटक: बेंगळुरू
– केरला: कोच्ची
– महाराष्ट्र: मुंबई, नागपूर आणि पुणे
– मध्य प्रदेश: इंदौर
– मणिपुर: इम्फाल
– ओडिशा: भुबनेश्वर, कटक, राउरकेला आणि पुरी
– राजस्थान: जयपुर, कोटा आणि उदयपुर
– तमिलनाडु: चेन्नई, कोयम्बटूर, मदुरई, होसुर आणि त्रिची
– तेलंगाना: हैदराबाद
– त्रिपुरा: अगरतला
– उत्तराखंड: देहरादून
– उत्तर प्रदेश: वाराणसी, लखनऊ, आगरा, मेरठ, गोरखपुर, कानपूर, प्रयागराज, नोएडा आणि गाजियाबाद
– पश्चिम बंगाल: सिलीगुड़ी

एअरटेलची ५जी उपलब्ध कशी चेक कराल
एअरटेल यूजर्स ५जी नेटवर्कची उपलब्धता आणि आपल्या स्मार्टफोनची कॅम्पॅटिबिलिटी एअरटेल थँक्स अॅपवर चेक करू शकता. एअरटेलने यूजर्सला हे निश्चित करून दिले आहे की, ५जी नेटवर्कचा वापर करण्यासाठी नवीन एअरटेल ५जी सिम घेण्याची गरज नाही. आधीच्या सिमकार्डवर ५जी टेक्नोलॉजी ऑटोमॅटिकली कनेक्ट होईल.

वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

एअरटेल या ५जी स्मार्टफोनला करतो सपोर्ट
जवळपास सर्वच मोठ्या स्मार्टफोन ब्रँड्सला एअरटेलने ५जी नेटवर्क साठी सिस्टम अपडेट रिलीज केले आहे. Realme, Xiaomi, Oppo, Vivo, iQOO, Apple, OnePlus, Samsung, Nothing Phone 1, Nokia, Lava, Tecno, Infinix आणि Motorola च्या ५जी हँडसेट्सला सॉफ्टवेयर अपडेट मिळाले आहे. गुगलने जानेवारी २०२३ मध्ये Google Pixel 6A, Pixel 7 आणि Pixel 7 Pro ला अपडेट केले आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा

Source link

airtel 5gairtel 5g latest newsairtel 5g latest updateairtel 5g networkairtel 5g networksairtel 5g news
Comments (0)
Add Comment