शिर्डी पोलीस ठाण्यात गोंदकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांनी सोशल मीडियात ३१ जानेवारीला यूट्युबवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये साईबाबांविषयी बदनामीकारक व खोटे वक्तव्य करण्यात आलेले आहे. त्यातील माहितीनुसार गिरधर स्वामी, हिरालाल श्रीनिवास काबरा (रा. हैदराबाद) यांनी हे वक्तव्य केल्याचे आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचे आढळून आले. यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
वाचा- डुप्लीकेट चायना माल कमेंटवर पत्नीने जाब विचारला; पठाणनंतर पेव्हर ब्लॉकने पतीचे डोकं फोडलं
गिरधर स्वामी यांनी हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. हैद्राबादमध्ये जाऊन तसेच तांत्रिक मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहेत.