कपल फिरायला गेलं, रस्त्याचा अंदाज न आल्याने मध्यरात्री बाईकसह विहिरीत कोसळलं, तरुणीचा मृत्यू

सांगली : तासगाव तालुक्यातील पेड नजीक एक अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला आहे. दोघे जण दुचाकीवरून घरी परतत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत जाऊन पडून ही घटना घडली आहे.

तासगाव तालुक्यातले दोन वेगवेगळ्या गावात राहणारे एक प्रेमीयुगुल फिरण्यासाठी तासगाव तालुक्यातल्या पेड नजीक पर्यटन केंद्राच्या ठिकाणी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतत असताना या प्रेमयुगुलांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये अल्पवयीन तरूणीचा बुडून मृत्यू झाला, तर अल्पवयीन तरूण बचावला आहे. हे प्रेम युगुल दुचाकीवरून पेडपासून काही अंतरावर आले असता त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि रात्र असल्याने काही कळण्याच्या आतच ते दोघंही दुचाकीसह थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळले.

मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; दक्षिण महाराष्ट्रातील ८ नेते मंत्रिपदाच्या स्पर्धेत

विहिरीमध्ये कोसळल्यानंतर मुलाला पोहता येत असल्याने तो कसाबसा विहिरीतून बाहेर आला. मात्र, तो त्याच्या प्रेयसीला वाचवू शकला नाही. तर तिला पोहता येत नसल्याने तिचा विहिरीतच मृत्यू झाला. विहिरीच्याबाहेर आल्यानंतर तो तरूण निघून गेला. सदर घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मुलीच्याही शोधाच्या निमित्ताने नातेवाईक या ठिकाणी पोहोचले.

त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून विहिरीमध्ये शोध घेऊन मुलीचा मृतदेह आणि त्या ठिकाणी पडलेली दुचाकी बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी युवतीच्या पालकांनी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तरूणाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपसा तासगाव पोलीस करत आहेत.

भक्तांसाठी मोठी बातमी; साईबाबांसंबंधी आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Source link

sangli crime newssangli tasgaon couple falls into well with bikesangli tasgaon crime newssangli tasgaon youth falls into wellसांगली क्राईम बातम्यासांगली तासगाव क्राईम बातम्यासांगली तासगाव तरुण तरुण विहिरीत कोसळलेसांगली तासगाव प्रेमीयुगुल गाडीसह विहिरीत कोसळले
Comments (0)
Add Comment