मोबाइलवर आलेला मेसेज चुकीचा असू शकतो असे वाटून काही विद्यार्थी परीक्षाकेंद्रावर पोहोचले. त्यावेळी त्यांना परीक्षा रद्द झाल्याची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला.
७५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिक्षावर बहिष्कार
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याचा निषेध म्हणून वालचंद आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयाबाहेर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सोलापूर विद्यापीठ अंतर्गत काम करत असलेल्या शिक्षकांनी यापूर्वी माहिती देताना,सहा मागण्या केल्या होत्या.
१) सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे शासन निर्णय पुनर्जिवित करून पूर्ववत लागू करा.
२) सातव्या वेतन आयोगानुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना कर्मचाऱ्यांना लागू करा.
३) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या एक हजार ४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ द्या.
४) विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनचा वेतनातील फरक द्यावा.
५) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या; जुनी पेन्शन योजना लागू करा.
६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी द्या.
शहरातील हजारो विद्यार्थी परतले
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी महाविद्यालयात दाखल झाले होते.महाविद्यालयात परिक्षेसाठी ड्युटीवर असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातल्याने महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा रद्द झाल्याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. सत्र परिक्षेसाठी दाखल झालेले हजारो विद्यार्थी घरी परतले.