Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?

नवी दिल्लीः Samsung ने आपली फ्लॅगशीप सीरीज Samsung Galaxy S23 ला लाँच केले आहे. या सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन Galaxy S23 Ultra, Galaxy S23+ आणि Galaxy S23 ला लाँच करण्यात आले आहे. या सीरीजच्या फोनमध्ये लेटेस्ट Snapdragon 8 Zen2 चिपसेट सपोर्ट दिला आहे. सॅमसंग कंपनीची ही प्रीमियम स्मार्टफोन सीरीज आहे. या सीरीज मधील फोनची टक्कर थेट लेटेस्ट iPhone 14 सीरीजशी होणार आहे, असे मानले जात आहे. कारण, या फोनची किंमत आणि आयफोन १४ ची किंमत जवळपास त्याच रेंज मध्ये आहे. जाणून घ्या डिटेल्स.

फोनची भारतातील किंमत
Samsung Galaxy S23 Ultra १२ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ लाख ५४ हजार ९९९ रुपये आहे.
Samsung Galaxy S23 Ultra १२ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेज. किंमत १ लाख ३४ हजार ९९९ रुपये.
Samsung Galaxy S23 Ultra १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज. किंमत – १ लाख २४ हजार ९९९ रुपये.
Samsung Galaxy S23+ ८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेज. किंमत – १ लाख ४ हजार ९९९ रुपये.
Samsung Galaxy S23+ ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज. किंमत – ९४ हजार ९९९ रुपये.
Samsung Galaxy S23 ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज. किंमत – ७९ हजार ९९९ रुपये.
Samsung Galaxy S23 ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज. किंमत – ७४ हजार ९९९ रुपये.

वाचाः कालच्या बजेटचा सोशल मीडियावर आज धुमाकूळ, पाहा मिम्स आणि ट्विटर हॉट ट्रेंड

Samsung Galaxy S23 सीरीजची अमेरिकेतील किंमत
Samsung Galaxy S23 १,१९९ डॉलर (जवळपास ९८ हजार १३३ रुपये)
Samsung Galaxy S23+ ९९९ डॉलर (जवळपास ८१ हजार ७६५ रुपये)
Samsung Galaxy S23 ७९९ डॉलर (जवळपास ६५ हजार ३९६ रुपये)
Samsung Galaxy S23 आणि Samsung Galaxy S23+ चार वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये येतील. यात फँटम, ब्लॅक, ग्रीन, क्रीम आणि लेवेंडर कलर ऑप्शनचा समावेश आहे.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

फोनमध्ये काय आहे खास
Samsung Galaxy S23 सीरीजच्या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC सपोर्ट मिळतो. फोनला 1750nits ची पीक ब्रायटनेस आणि OLED डिस्प्ले सपोर्ट सोबत आणले आहे. Samsung Galaxy S23 आणि S23+ स्मार्टफोन मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. याशिवाय, 12MP चा अल्ट्रा-वाइड एंगल लेंस आणि 10MP चा टेलीफोटो लेंस दिला आहे. तर Galaxy S23 Ultra मध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. याशिवाय, 12MP अल्ट्रा-वाइड एंगल लेंस आणि 10MP चे दोन टेलीफोटो लेंस दिले आहेत.

वाचाः ९ फेब्रुवारीला लाँच होतोय Realme GT Neo 5, पाहा संभावित फीचर्स

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

Samsung Galaxy S23samsung galaxy s23 featuresamsung galaxy s23 price in indiaSamsung Galaxy S23 seriessamsung galaxy s23 specificationSamsung Galaxy S23 Ultra
Comments (0)
Add Comment