पोलीसच चोरीचा शिकार; मेहुण्यासोबत चहा प्यायला जाताच बाहेर चोरट्याने संधी साधली

बीड : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. यातच बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील नगर नाका परिसरात एक पोलीस कर्मचारी आपल्या मेहुण्यासोबत चर्चा करत होते. चर्चा करत असताना मेहुण्याचे काही मित्र तिथे आल्याने ते आपल्या दुचाकीपासून काही अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. अन् तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधत त्यांची दुचाकी लंपास केली.

बिबीशन लक्ष्मण सांगळे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सांगळे हे मुळचे चिखल बीड वडवणीचे रहिवासी आहेत. सध्या ते बीड शहरातील अंकुश नगर भागात वास्तव्यास असून बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यात अंमलदार या पदावर कार्यरत आहेत. सांगळे यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलांनी धुळे येथून एक दुचाकी विकत आणली होती. ती अजून नावावर देखील झालेली नव्हती. ती दुचाकी अद्याप पहिल्या मालकाच्या नावावरच होती.

विधानपरिषदेचा पहिला निकाल हाती; भाजप-शिंदे गटाने खातं उघडलं, मविआला मोठा धक्का

मात्र, मी आणि माझा मेहुणा नगर नाका परिसरात उभे असताना माझ्या मेहुण्याचे काही मित्र तिथे आले आणि आम्ही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो. दरम्यान, चहा पिण्यासाठी एकंदरीत १० ते १५ मिनिटे लागली. चहा पिऊन परत आलो आणि गाडी पार्क केली होती, त्या दिशेने गेलो. मात्र, तिछे पोहोचताच गाडी नजरेस पडली नाही, म्हणून तिचा इतरत्र शोध घेतला. काही वेळानंतर आपली दुचाकी काही अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं समजलं.

या सगळ्या आपबीतीनंतर सांगळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, बीड जिल्ह्यात आतापर्यंत या दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट नेहमीच पाहायला मिळतो. कित्येक गाड्यांचा आतापर्यंत शोध देखील लागलेला नाहीये. अनेक लोकांच्या गाड्या चोरीला गेलेल्या असून गाडी मालक नेहमीच पोलीस ठाण्यात हेलपाटे मारून कंटाळले आहेत. आता मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याचीच दुचाकी चोरट्याने लंपास केल्यानं ही गोष्ट बीड शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

अदानी समूहातील शेअर्सची दाणादाण, फक्त पाच ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदार कंगाल

Source link

beed crime newsbeed marathi breaking newsbeed nagar naka police bike stolenbeed police car stolenबीड क्राईम बातम्याबीड नगर नाका पोलीस दुचाकी चोरीबीड पोलीसाची गाडी चोरलीबीड मराठी ब्रेकिंग बातम्या
Comments (0)
Add Comment