WhatsApp ने बॅन केले ३६ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट, हे आहे कारण

नवी दिल्ली: WhatsApp Account: इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने एकाच वेळी ३६ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट्स बंद केले असून हे अकाउंट्स १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान बॅन करण्यात आले आहेत. युजर्सच्या तक्रारीच्या आधारे ही खाती बॅन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापैकी सुमारे १४ लाख खाती होती, जी भारतीय युजर्सच्या तक्रारींच्या आधारे बंद करण्यात आली. याआधी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅपने देशातील ३७ लाखांहून अधिक भारतीय खाती बंद केली होती. कंपनीने IT कायदा २०२१ च्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे.

वाचा: Bluetooth डिव्हाइसशी कनेक्ट होत नसेल तर बदला ‘या’ सेटिंग्स

व्हॉट्सअॅपने दिली माहिती:

कंपनीने सांगितले की, १ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ३६.७७ लाख भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यापैकी १३.८९ लाख खाती भारतीय युजर्सच्या तक्रारींच्या आधारे बंद करण्यात आली आहेत. नोव्हेंबरमधील ९४६ तक्रारींच्या तुलनेत डिसेंबरमध्ये WhatsApp युजर्सकडून अपील ७० टक्क्यांनी वाढून १,६०७ वर आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

वाचा: स्वस्त झाले मोटोरोलाचे हे पॉप्युलर स्मार्टफोन्स, मिळतोय १५,००० रुपयांपर्यंतचा ऑफ

त्यापैकी कंपनीने केवळ १६६ अपीलांवर प्रक्रिया केली. व्हॉट्सअॅपने सांगितले की, पूर्वीची तिकिटे आणि डुप्लिकेट तिकिटे वगळता सर्व तक्रारींना उत्तर दिले जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. डिसेंबरमध्ये व्हॉट्सअॅपने देशात ३७.१६ लाख अकाउंट्सवर बंदी घातली होती, त्यापैकी ९.९ लाख खाती सक्रियपणे बॅन करण्यात आली होती.

नवीन आयटी नियमांतर्गत वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा विचार करून या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. IT कायदा २०२१ अंतर्गत, ५० लाखांहून अधिक युजर्स असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक महिन्याला आयटी मंत्रालयाला वापरकर्ता सुरक्षा अहवाल सादर करावा लागतो.

नोव्हेंबरमध्ये ३७ लाखांहून अधिक खाती बंद करण्यात आली होती:

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ३७ लाखांहून अधिक भारतीय खाती बंद करण्यात आली. युजर्सच्या तक्रारीच्या आधारे ही खाती बॅन करण्यात आली आहेत. यापैकी १० लाख खाती अशी होती, जी भारतीय युजर्सनी फ्लॅग केली होती.

वाचा: Budget 2023: AI साठी तीन नवीन सेंटर सुरू होणार, 5G विकासाबाबत देखील महत्वाची घोषणा

Source link

WhatsApp accountsWhatsApp ban accountsWhatsApp featuresWhatsApp updatesWhatsApp users
Comments (0)
Add Comment