वाचा: Budget 2023: AI साठी तीन नवीन सेंटर सुरू होणार, 5G विकासाबाबत देखील महत्वाची घोषणा
OnePlus Buds Pro च्या सर्व कलर व्हेरियंटसाठी ही किंमत कपात करण्यात आली आहे. तुम्ही ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १००० रुपयांची झटपट सूट देखील मिळेल. त्याच वेळी Mobikwik वॉलेटद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्सना ५०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
वाचा: यूएसमधील शाळांपासून ते भारतातील महाविद्यालयांमध्ये का होतेय ChatGPT बॅन? पाहा डिटेल्स
OnePlus Buds Pro चे फीचर्स:
OnePlus Buds Pro मध्ये पॉवरफुल आवाजासाठी ११ mm ड्रायव्हर्स आहेत. यामध्ये सक्रिय आवाज रद्द करण्यासाठी ३ मायक्रोफोन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी यामध्ये ब्लूटूथ 5.2 देत आहे. कंपनी या बड्समध्ये ३७ mAh बॅटरी देत आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी ANC शिवाय ७ तास काम करते .
चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी केबल सपोर्ट
बड्सच्या चार्जिंग केसमधील बॅटरी ५२० mAh आहे. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी केबल सपोर्ट आहे. हे Qi वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. चार्जिंग केससह, बड्सचा बॅटरी बॅकअप ३८ तासांपर्यंत जातो. OnePlus Buds Pro मध्ये कंपनी ड्युअल कनेक्शन फीचर देखील देण्यात आले आहे. त्यात दोन कनेक्ट केलेल्या उपकरणांमध्ये ते सहजपणे बदलले जाऊ शकते.
वाचा: Budget 2023: KYC अधिक सोपे होणार, मिळणार वन-स्टॉप सोल्यूशन, एकाच अॅपवर होणार काम