सुधाकर अडबाले हे चंद्रपूरचे असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून त्यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसनं सुधाकर अडबाले यांना वर्षभरापूर्वीच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मविआच्या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता. नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न दाखल केल्यानं मतदारसंघांची अदलाबदली करण्यात आली. यामध्ये सेनेनं नागपूरच्या जागेवरुन उमेदवार मागं घेतला. मविआनं सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला.
काँग्रेस नेत्यांनी करुन दाखवलं
काँग्रेस नेते अभिजीत वंजारी, राजेंद्र मुळक, बबनराव तायवाडे, विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांनी सुधाकर अडबाले यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी केली आणि विजय खेचून आणला. काँग्रेसनं भाजपला पदवीधर पाठोपाठ नागपूर शिक्षक मतदारसंघात धक्का दिला आहे.
राजकारण बदलतंय, गुरुदेव काय करायला हवं? अशोक चव्हाणांच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर म्हणाले…
नागो गाणार यांना अँटीइन्कबन्सीचा फटका
नागूपर, कोकण आणि औरंगाबाद या तीन शिक्षक मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात विद्यमान आमदारांना फटका बसल्याचं चित्र आहे. कोकण मतदारसंघात शेकापच्या बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. तर, नागपूरमध्येही नागो गाणार यांना अँटीइन्कबन्सीचा फटका बसला आहे.
MLC Election Results Live Update : नागपुरात ‘मविआ’चे सुधाकर आडबाले विजयी
जुन्या पेन्शननं वाढवलं टेन्शन
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेली एकजूट आणि जुन्या पेन्शनचा मुद्दा सुधाकर अडबाले यांच्या विजयात महत्त्वाचा ठरला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन देता येणार नाही, असं म्हटलं होतं. जुन्या पेन्शनवरुन शिक्षकांमध्ये याबद्दल रोष होता. त्याचाही फटका नागो गाणार यांना बसला आहे.
सत्यजीत तांबेंना विजयाचे बॅनर्स उतरवण्याची वेळ येईल; शुभांगी पाटलांचं चॅलेंज
मी शब्दाला पक्की, विजय होताच आंदोलनाला बसणार; मतदानानंतर शुभांगी पाटलांचा पुनरुच्चार