तो खास क्षण आलाच! अभिनेत्री वनिता खरात अडकली विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री वनिता खरात आज विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसांपासून वनिताच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर आज २ फेब्रुवारी २०२३ रोजी तिनं लग्न थाटामाटात पार पडलं. या नवदाम्पत्यावर शुभेच्छा सेलिब्रिटी तसंच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वनिता आणि सुमित यांच्या प्रीवेडिंग शूटमधील फोटो आणि लग्नापूर्वींच्या विधींचे फोटो व्हायरल झालो होते. तिच्या मेहंदीच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतल्यानंतर हळदीच फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले होते.

वनिताच्या लग्नसोहळ्याला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती, त्याप्रमाणं तिचा मित्रपरिवार उपस्थित होता. वनिताच्या नवऱ्याविषयी सांगायचं झालं तर तो एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर तो विशेष सक्रिय असून वनितासोबतही त्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर आहेत.



Source link

vanita kharatvanita kharat and sumit londheVanita Kharat And Sumit Londhe Weddingvanita kharat marriagevanita kharat marriage photosvanita kharat photosvanita kharat weddingvanita kharat wedding photosवनिता खरातसुमित लोंढे
Comments (0)
Add Comment