बुलडाण्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड, १ कोटी १४ लाखांच्या नकली नोटा अन् बनावट सोनंही जप्त…

बुलडाणा: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कोण काय करेल हे सांगता येत नाही आणि विश्वास ठेवून कसं फसगत होईल हे देखील माहीत नसते. पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने नकली नोटा देवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी काल रात्री औंढा नागनाथ पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरुन ९ जणांना अटक केली. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील खामगावातून तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज, राहुल चंद्रसिंग ठाकूर यांचा समावेश असून त्यांच्या घरातून ७५ लाखाच्या नकली नोटा आणि बनावट सोनं जप्त करण्यात आलं आहे. या तिघांसह पोलिसांनी वेगवेगळया ठिकाणावरुन ९ जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील एका महिलेची नांदेड आणि लातूर येथील विनोद शिंदे, केशव वाघमारे, विलास वडजे, सोमनाथ दापके, सुनील जगवार या पाच जणांसोबत ओळख होती. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. त्यांनी महिलेला १ लाख रुपयांचे ३ लाख रुपये करून देतो असं आमिष दाखविलं. महिलेने त्यासाठी १० लाख रुपये सोबत घेऊन बुधवारी थेट नादेड गाठले. त्या ठिकाणी उतरल्यानंतर महिला एका वाहनाने औंढा नागनाथकडे निघाली होते. तर ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खामगाव येथून पाच जण गाडीने औंढा नागनाथकडे आले होते.

औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीच्या आवारात महिलेने जवळील १० लाखांच्या नोटा आरोपींना दिल्या. त्या बदल्यात गाडीतील व्यक्तींनी ४० लाखांच्या नोटांची बँग महिलेकडे दिली. त्यानंतर ते फरार झाले. दरम्यान, औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयासमोर वाहन थांबवून त्यांनी नोटा मोजण्यास सुरवात केली. यावेळी महिला वाहनाबाहेरच थांबली होती. याचवेळी गस्तीवर असलेल्या औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वानाथ झुंजारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, रवी हरकाळ, अमोल चव्हाण यांनी महिलेस हटकले, पोलिसांना पाहताच महिलेसोबतच वाहनातील पाच जणांच्या चेहऱ्यावर घाम फुटला.
पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी महिलेकडे विचारणा केली असता तिने आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आणि तिला देण्यात आलेल्या ४० लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटांची बॅग दाखवली. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तर, या प्रकरणाची माहिती पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांना दिली. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांची नाकाबंदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

या नाकाबंदीमध्ये पथकाने वादनासह ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज, राहुल चंदुसिंग ठाकूर (सर्व रा. खामगाव) यांना ताब्यात घेतले. दरम्यान, व्हिडीओ कॉलिंगवरून त्यांची ओळख पटल्यानंतर खामगाव पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात ७५ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा आणि बनावट सोने सापडले. त्यानंतर आज पहाटेच ओढा पोलिसांच्या पथकाने खामगाव येथे येवून त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणात नऊ जणांची चौकशी सुरु असून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. उर्वरीत दोघांसह १० लाख रुपयांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Source link

big racket of fake notes bustedBuldhana Crime newsbuldhana fake note racketbuldhana newsBuldhana policefake gold seizedfake notesfake notes racket bustedबनावट नोटांचा कारखानाबुलडाणा बातम्या
Comments (0)
Add Comment