विद्यार्थी नेता ते आमदार, हीच ती वेळ म्हणत अपक्ष लढले, वडिलांप्रमाणं सत्यजीत तांबे विजयी

नाशिक : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन कोकण, औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदारंसघ आणि नाशिक आणि अमरावती दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पाच मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदारसंघाबद्दल झाली. काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी मुलगा सत्यजीत तांबे यांच्या साठी माघार घेतली. यामुळं काँग्रेसनं सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. नाशिकची जागा काँग्रेसनं शिवसेनेसाठी सोडली. महाविकास आघाडीनं नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता.शुभांगी पाटील यांच्या उमदेवारीमुळं मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. अखेर सत्यजीत तांबे यांनी शुभांगी पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. सत्यजीत तांबे यांनी ६८९९९ मतं मिळाली. शुभांगी पाटील यांना ३९५३४ मिळाली तर १२९९७ मतं बाद झाली आहेत. पाचव्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना २९४६५ मतांनी विजय मिळाला.

विद्यार्थी नेता ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
सत्यजीत सुधीर तांबे हे महाराष्ट्रातील तरुण राजकीय नेते आहेत. त्यांनी साल 2000 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी विद्यार्थी चळवळीतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, ह्या इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) च्या विद्यार्थी संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. 2007 मध्ये, वयाच्या 24 व्या वर्षी, त्यांनी अहमदनगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत यश संपादन केले, आणि जिल्हा परिषद निवडणूक जिंकणारे सर्वात तरुण सदस्य बनले. 2007 आणि 2012 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ते सलग दोन वेळा निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विशेषत: शिक्षण, आरोग्य, पेयजल योजना, स्वच्छता उपक्रम इत्यादी समाजोपयोगी क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले.

२०१४ ला विधानसभेला पराभव, आता विधानपरिषदेत

सत्यजीत तांबे यांनी विद्यार्थ्यांसाठी राजकारणात मोठे योगदान दिल्यानंतर २००७ ते २०११ दरम्यान ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहिले होते. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, २०११ आणि २०१४ साली त्यांनी सलग दोन वेळा मतदान पद्धतीद्वारे ते ह्या पदावर आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडणूकीतून निवड झाली. त्यानंतर ते ह्या पदावर मार्च २०२२ पर्यंत ते कार्यरत राहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी युवकांचे आणि राज्यातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी आठ ते नऊ वेळा राज्याचा दौरा केला. शिवाय, त्यांच्या ‘सुपर ६०’ आणि ‘सुपर १०००’ या प्रकल्पांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांचे तसेच संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या योगदानाचे पक्षाच्या नेत्यांनी खूप कौतुक केले होते.

माझा मित्र गेलाय, आज कोणताही आनंदोत्सव नाही; सत्यजीत तांबे मानसच्या एक्झिटने व्यथित

स्थानिक राजकारणाव्यतिरिक्त, सत्यजीत तांबे यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण, युवा सक्षमीकरण आणि शहरी विकासात देखील मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनी मॅनेजमेंट आणि पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेतले आहे. अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथे देखील त्यांनी शिक्षण घेतले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशीही त्यांची नेहमीच जवळीक राहिली आहे. त्यांचे सर्वच पक्षांतील राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत.

दुधाची पिशवी उधार दिली नाही म्हणून दोघांवर जीवघेणा हल्ला, बुलडाण्यातील धक्कादायक घटना..

तांबे यांना महाराष्ट्रातील प्रमुख वृत्त संस्थेपैकी एक असलेल्या लोकमतने महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यजीत तांबे यांची दोन पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत. सिटीझनविले, कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर गॅविन न्यूसम यांचे शहरी नियोजनावरील पुस्तक, त्यांनी अनुवादित केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे सीईओ आणि एमडी आशिष चौहान, गौर गोपाल दास आणि क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांच्या उपस्थितीत नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘आंदोलन-उद्यासाठी आता’ या कॉफी टेबल बुकचे लिखाणही त्यांनी केले आहे

दोन ‘सारा’मध्ये फसलेल्या गिलसाठी आली तिसरी ऑफर, Live मॅचमध्ये तरुणीनं प्रपोज केलं अन्…

Source link

bjpCongressmlc election resultnashik vidhan parishadsatyajeet tambesatyajeet tambe political careershubhangi patilsudhir tambeVidhan Parishad Electionसत्यजीत तांबे
Comments (0)
Add Comment